
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
वृध्द महिला बाथरूममध्ये आंघोळीला गेली असताना घरात घुसून तिच्या नात्यातील महिलेनेच कपाटातून 80 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून (Stealing Gold Ornaments) नेल्याची घटना नगर-दौंड रोडवरील (Nagar-Daund Road) हनुमाननगर येथे शुक्रवारी सकाळी 10 ते 10.30 च्या सुमारास घडली होती.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) दागिणे चोरणार्या महिलेला अटक (Woman Arrested for Stealing Jewellery) केली आहे. माया मार्कस तिजोरे (वय 35 रा. इंदीरानगर, अहमदनगर) असे अटक (Arrested) केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून 80 हजार रूपयांचे सोन्याचे दागिणे जप्त (Gold Ornaments Seized) करण्यात आला आहे. लिलाबाई विश्वनाथ वाघमारे (वय 65 रा. हनुमाननगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) फिर्याद दिली होती. फिर्यादी वाघमारे यांची मावस नातसून माया तिजोरे ही वाघमारे यांच्या घरात आली व तिने 80 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शरद गायकवाड, योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, अमोल गाढे, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, तान्हाजी पवार, संदीप थोरात, अभय कदम, अतुल काजळे, कल्पना आरवडे, सतीष भांड, प्रशांत बोरूडे यांच्या पथकाने माया तिजोरे हिला राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली.