दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी

तारकपूर बसस्थानकावरील घटना
दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मंगळसुत्रासह रोख रक्कम असा एक लाख 40 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेले. शहरातील तारकपूर बस स्थानकावर रविवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमाराची ही घटना घडली. याप्रकरणी रूपाली रामेश्वर औटे (वय 31 रा. चंदननगर, पुणे) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रूपाली औटे या अहमदनगरला आई-वडिलांना भेटल्यानंतर त्या पुण्याला जाण्यासाठी तारकपूर बस स्थानकावर आल्या होत्या. त्यांच्याकडे एक बॅग, हात पिशवी आणि पर्स होती. त्या बस स्थानकावर आल्या असता, चोरट्यांनी त्यांची पर्स चोरली. यामध्ये चार तोळे वजनाचे मंगळसूत्र आणि सातशे रुपये रोख रक्कम होती. औटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सलीम शेख पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com