नजर चुकवून चोरले दोन तोळ्याचे दागिने

नेप्ती रोडवरील घटना || चावी बनविणार्‍याची हातचलाखी
नजर चुकवून चोरले दोन तोळ्याचे दागिने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कपाटाला नवीन चावी बनवुन देणार्‍याने महिलेची नजर चुकवून कपाटातील दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. नेप्ती रोडवरील (Nepti एकनाथनगरमध्ये शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अनुराधा सचिन पवार (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या घरातील कपाटामध्ये 11 ग्रॅमचे नॅकलेस, पाच ग्रॅमची अंगठी, पाच ग्रॅमचे मंगळसूत्र असे दोन तोळे एक ग्रॅमचे दागिने ठेवलेले होते. दरम्यान या कपाटाची चावी हरवली होती.

शनिवारी फिर्यादी यांच्या गल्लीत चावी बनविणारा आला होता. त्यांनी त्याला कपाटाची नवीन चावी बनविण्यासाठी घरात नेले. त्याने चावी तर बनवली नाही परंतू कपाटात ठेवलेले दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले. फिर्यादी यांना शंका आल्याने त्यांनी पकडीने कपाटाचा लॉक उघडला असता त्यांना दागिने चोरीला गेल्याचे लक्ष्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com