जेऊरहैबती येथील बेकायदा उत्खनन; नंदिवाले समाजाचा 14 जुलैला रास्तारोको

जेऊरहैबती येथील बेकायदा उत्खनन; नंदिवाले समाजाचा 14 जुलैला रास्तारोको

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील जेऊर हैबती येथे मुरुम-मातीचे बेकायदा उत्खनन करून चोरी केल्या प्रकरणी तलाठी व कुकाणा मंडलाधिकारी यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल व ग्रामस्थांना अपशब्द वापरल्याबद्दल ताबडतोब निलंबित करावे व सदरच्या अवैध गौण खनिज उत्खननाबाबत आपण स्वतः चौकशी करुन कारवाई करावी तसे न केल्यास नंदिवाला समाजाचे लोक व जेऊर हैबती ग्रामस्थ दि.14 जुलै रोजी कुकाणा येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करतील असा इशारा नंदीवाले समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.

याबाबत ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब फुलमाळी यांनी जिल्हाधिकारी व नेवासा तहसीलदार यांना दिले आहे. त्यात म्हटले की, आम्हास मौजे जेऊर हैबती येथे गट नं. 289 मधुन घरकुले दिलेली असून त्या घरकुलाची नोंद गावचे रेकॉर्डला झालेली आहे. आमच्या समाजाचे देवस्थान म्हणून रामबाबा यांचे मंदीर हे घुगरे वस्ती-म्हस्के वस्तीच्या जवळ नदीच्या तीरावर जुने मंदीर असून सदरची जागा ही इनाम आहे. महसुल कर्मचारी हे उत्खनन करणारेचे लाभात गोलमाल रिपोर्ट व पंचनामा करीत आहेत.

सदरचा पंचनामा आमच्या समाजातील लोकांना व ग्रामस्थांना मान्य नाही. महसुलचे कर्मचारी सदरच्या घटनेबाबत कुठलीही कारवाई करत नाहीत. महसुल कर्मचारी गाव कामगार तलाठी व मंडलाधिकारी यांना कर्तव्यात कसूर केल्याबाबत ताबडतोब निलंबित करावे व सदरच्या अवैध गौण खनिजाचे उत्खननाबाबत आपण स्वतः चौकशी करुन कारवाई करावी तसे न केल्यास नंदिवाले समाजाचे लोक व ग्रामस्थ हे दि.14 जुलै रोजी कुकाणा येथे रास्तारोको आंदोलन करतील.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com