
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव शहर व शहरालगतच्या उपनगरात धारणगाव रोड, जेऊर पाटोदा भागात मोठ्या प्रमाणात डुकरांचा सुळसुळाट झालेला आहे. यात सध्या मोठ्या प्रमाणात उष्णता वाढल्याने डुकरांचा मृत्यु होत आहे. मृत डुकरांची दुर्गधी सुटल्याने या भागातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या डुकरांचा प्रतिबंध करण्यासाठी नगरपालिका व ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे. मृत्युमुखी पडलेल्या डुकरांना काही मोकाट कुत्रे भक्ष म्हणून ग्रहण करत असल्यामुळे कुत्र्यांची संख्या देखील वाढलेली दिसून येते. त्यामुळे या परीसरात राहणार्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पिण्यासाठी पाणी नाही तर उष्णतेच्या दहाकतेने डुकरे मृत्यूमुखी पडत असावी, अशी शंका नागरिकांना येत आहे. वाढलेल्या डुकरांचा कोपरगाव नगरपालिका व लगतच्या ग्रामपंचायतीने तात्काळ पुढाकार घेऊन प्रतिबंध करावा, अशी मागणी होत आहे.