जेऊर कुंभारी ग्रामस्थांचा महावितरण अधिकाऱ्यांना घेराव !

जेऊर कुंभारी ग्रामस्थांचा महावितरण अधिकाऱ्यांना घेराव !

जेऊर कुंभारी |वार्ताहार| Jeur Kumbhari

कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील जेऊर कुंभारी (Jeur Kumbhari) गावातील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीने (MSEDCL) सांगीतल्या पद्धतीने विजबिल न भरल्याने महावितरण (MSEDCL) कंपनीने शेतकऱ्यांचा विजपुरवठा खंडीत (Power Outage) करण्याची मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वाढीव मुदत मिळावी यासाठी जेऊर कुंभारी (Jeur Kumbhari) येथील शेतकऱ्यांनी कोपरगाव (Kopargav) येथील कंपनीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना विनंती केली. शेतकऱ्यांनी आपली थकलेल्या बिलातील रक्कम तसेच चालु चार बिलातील महावितरण कंपनीने (MSEDCL) ठरवुन दिलेली रक्कम भरणे बंधनकारक असुन तसे न झाल्यास त्यांचा विजपुरवठा खंडीत (Power Outage) केला जाणार असल्याचा फतवा महावितरण कंपनीने काढला असुन त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर काही तोडगा काढता येइल का यासाठी जेऊर कुंभारीचे उपसरपंच जालिंदर चव्हाण ,बाळासाहेब वक्ते, मधुकर वक्ते, नारायण गुरसळ, राजेंद्र पगारे आशोक राऊत कोंडीराम वक्ते, भिकाभाऊ चव्हाण, राजेंद्र गिरमे, अविनाश आव्हाड, विजय शिंदे, विजय गिरमे, सोपानराव वक्ते, कल्याण गुरसळ, महेंद्र वक्ते, किरण पाटीलबा वक्ते, किरण एकनाथ वक्ते, हरिभाऊ गुरसळ, शरद चव्हाण, कैलास चव्हाण, गोरक चव्हाण, दादासाहेब चव्हाण, सुधीर शिंदे, विजय शिंदे, शिवजी वक्ते, गोकुळ जावळे, समीर गिरमे, साहेबराव काटे, संजय वक्ते, चांगदेव कातकडे, यांनी विज महावितरण अधिकार्‍यांची भेट घेऊन विज बिलात सवलत व ती भरण्यास थोडी मुदतवाढ मिळावी अशी विनंती केली. परंतु महावितरण कंपनीचे अधिकारी आपल्या मतावर ठाम राहील्याने आता शेतकऱ्यांना ती रक्कम भरणे अनिवार्य आहे.

वीज महावितरण विभागाने शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देता वीज तोडणी करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. सध्या रब्बीचा हंगाम चालू असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गहू कांदा लागवड केली आहे. विज महावितरण जेऊर कुंभारी गावातील शेतकऱ्यांची पूर्ण बिल न भरल्याने वीज तोडणी करून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. गेल्या दोन वर्षापासून कोपरगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे खरीप व रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात शासनाने तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पूसले आहे. त्यातून सावरून शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप पिकांची लागवड केली. जेऊर कुंभारी गावात पूर्ण बिल न भरल्याने महावितरण विभागाने शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता परस्पर विज रोहित्राचा पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान चालवले आहे. हे वेळीच थांबले जावे नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जेऊर कुंभारी ग्रामस्थांनी देण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com