सततच्या पावसाने जेऊरकुंभारी परिसरातील पिकांची नासाडी

सततच्या पावसाने जेऊरकुंभारी परिसरातील पिकांची नासाडी

जेऊरकुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari

कोपरगाव तालुक्यात सातत्याने होणार्‍या पावसाने जेऊरकुंभारी, चांदेकसारे, डाऊच खुर्द, डाऊच बुद्रुक, घारी पोहेगाव या भागातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. काही दिवसांपासून जेऊरकुंभारी परिसरात सतत होणार्‍या पावसाने पिके उपळली असून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मागील वर्षीही मुसळधार पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. शेतकरी मेहनतीने पिके शेतात उभे करतो.

पण नैसर्गिक संकटामुळे हाती आलेला घास हिसकावून घेतला जातो. यावर्षी पुन्हा पावसाने थैमान घातल्याने मागील वर्षाप्रमाणेच नुकसान होते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. सातत्याने पावसाने शेतातील सोयबीन, कापूस, मका पालेभाज्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. तेव्हा शासनाने सरसकट पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी जेऊर कुंभारी, चांदेकसारे, डाऊच खुर्द, डाऊच बुद्रुक, घारी, पोहेगाव या भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com