जेऊर कुंभारीत बिबट्याचे दर्शन

संग्रहीत चित्र
संग्रहीत चित्र

जेऊर कुंभार |वार्ताहर| Jeur Kumbhari

कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील जेऊर कुंभारी (Jeur Kumbhari) परिसरात वन विभागाच्या आर्शिवादने बिबट्या (Leopard) बघितल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

संग्रहीत चित्र
शून्य ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची होणार आरोग्य तपासणी

मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पाटीलबा शहाजी वक्ते यांच्या वस्तीवर बिबट्याचे (Leopard) आगमन झाले. किरण वक्ते, नामदेव वक्ते, आप्पा शहाजी वक्ते, शंकर वक्ते, सुधाकर वक्ते, किशोर गायकवाड, राणा वक्ते, राहुल वक्ते, गौरव पवार यांनी बिबट्या बघितल्यानंतर आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणारे पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली.

संग्रहीत चित्र
परवानगी न घेता बैलगाडा शर्यत भरवली; चौघांवर गुन्हा दाखल

त्यांनी आंगणात बिबट्या (Leopard) बघितल्यावर फटाके वाजल्यामुळे बिबट्या तिथून फरार झाला. ही घटना पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणाद्वारे ग्रामस्थांनी सावध करण्यात आले. तसेच या घटनेची माहिती वनविभाग अधीकारी श्रीमती सोनवणे यांना दिली. आजपर्यंत अनेक वेळा सांगूनही वन विभागाने (Forest Department) पिंजरा न लावल्याने बिबट्या (Leopard) बिनधास्त या परिसरात वावरत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.

संग्रहीत चित्र
अशोकनगरला कत्तीचा धाक दाखवत तिघांना लुटले

ही घटना रात्री 10 वाजता घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता सध्या शेतीमध्ये रब्बीची पिक गहू, हरबरा, कांदा (Onion) ही पिके आहे व लाईट रात्रीची असल्यामुळे शेतकरी व शेतमजुरी भयभीत झाले आहे. तेव्हा या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी सरपंच सुवर्णा पवार यांनी केली आहे.

संग्रहीत चित्र
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन बदल्या स्थगित कराव्यात- परजणे
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com