जेऊर कुंभारी येथे बिबट्याचे दर्शन

जेऊर कुंभारी येथे बिबट्याचे दर्शन

जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी परिसरात प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

जेऊर कुंभारी गावातील काशिनाथ वक्ते यांचा पाळीव कुत्रा दोन दिवसांपूर्वी बिबट्याने फस्त केला. ही घटना ताजी असताच काल सायंकाळी 6.30 च्या सुमारास अरविंद चिमाजी जाधव हे जनावरांना चारा टाकत असताना त्यांच्या घराच्या प्रांगणात बिबट्या व त्याचे दोन बछडे दिसले. त्यांनी लगेच सावधगिरी बाळगून आरडाओरडा करून ग्रामस्थांना सावध केले. आरडाओरडा झाल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.

ही माहिती पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे संपूर्ण गावाला देण्यात आली व शेतात जाताना सावधगिरी बाळगावी, असा संदेश दिला. तसेच जेऊर कुंभारी गावात बिबट्याचा वावर आहे ही घटना पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड यांनी भ्रमणध्वनीवरून वनविभाग अधिकारी श्रीमती सोनवणे यांना दिली. पण बिबट्याचे दर्शन होऊन 16 तास उलटले तरीही वन विभागाच्या एकाही अधिकार्‍याने किंवा कर्मचार्‍याने भेट दिली नाही. तरी वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com