कोपरगाव : जेऊर कुंभारी परिसरात दुबार पेरणीचे संकट

कोपरगाव : जेऊर कुंभारी परिसरात दुबार पेरणीचे संकट

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील जेऊर कुंभारी (Jeur Kumbhari) परिसरात शेतकर्‍यांवर पाऊसाने (Rain) पाठ फिरविल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

जेऊर कुंभारी परिसरात डाऊच खुर्द (Dauch Khurd), चांदेकसारे (chadeksare) परिसरात शेतकर्‍यांनी आपल्या शेतात सोयाबीन(Soybeans), मका (Corn) व इतर भाजीपाल्याची पिके (Vegetable crops) गेल्या महिन्यात पाऊस पडल्याने घेतली होती. मात्र गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून या परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने उतरलेली मका, सोयाबीन जळून जात असल्याचे चित्र दिसत आहे. गोदावरी कालव्यांना (Godavari Kalwa) पाणी सुटून या पिकांना पाणी देता येईल अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. मात्र हे पाणी गोदावरी नदीला (Godavari River) सोडल्याने शेतकर्‍यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे.

गेल्या दोन वर्षापासून करोनाची महाभयंकर परिस्थिती असताना आर्थिक अडचणीचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहेत. कसेबसे शेतीची मशागत करुन शेतकर्‍यांनी आपल्या शेतात पेरणी केली होती. मात्र पाऊस लांबल्याने ही पिके जळून जात आहे. सहा जुलै पासून महाराष्ट्रात पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. मात्र तो अंदाज कोपरगाव (Kopargav) तालुक्यात सपशेल खोटा ठरत असल्याने शेतकर्‍यांना आपली पिके कशी जगावी असा प्रश्न तयार झाला आहे. येत्या दोन दिवसात जर कोपरगाव तालुक्यात पाऊस झाला नाही तर जेऊर कुंभारी परिसरातील शेतकर्‍यांना दुबार पेरणी (Double sowing to farmers) करावी लागेल.पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकर्‍यांना आता मोठा आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com