जेऊरकुंभारीच्या नागरिकांना मिळणार पिण्यासाठी स्वच्छ पाणी

जेऊरकुंभारीच्या नागरिकांना मिळणार पिण्यासाठी स्वच्छ पाणी
पाणी पुरवठा

जेऊरकुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari

जेऊरकुंभारी गावच्या नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी 15 व्या वित्त आयोगाच्या बंधीत निधीतून 5.30 लाख रुपये किमतीचा अ‍ॅरो प्लँट मंजुर केला असल्याची माहिती माजी सभापती, विद्यमान सदस्य अनुसयाताई रोहिदास होन यांनी दिली.

जेऊरकुंभारी हे गाव सभापती सौ अनुसयाताई होन यांचे माहेर आहे. त्यामुळेही गावाला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे या साठी त्या प्रयत्नशील होत्या. ना.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसयाताई होन यांनी पंचायत समिती अंतर्गत विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत यावेळी हनुमंतराव मेहेत्रे, साईनाथ वायकर, अनिल दवंगे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीपराव शिंदे, समाजीक कार्यकर्ते पाटीलबा वक्ते, बापुराव वक्ते, कल्याणराव गुरसळ, सुधाकर होन, शिवाजी म. वक्ते, महेंद्र वक्ते, किशोर वक्ते, राजेंद्र गिरमे, राजेंद्र पगारे, सोपानराव वक्ते, विजय सोळके, किरण वक्ते, नानासाहेब गुरसळ, बंडू नाना गिरमे, शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विशाल गुरसळ, शिवमुद्रा प्रतिष्ठान अध्यक्ष प्रितम गायकवाड, कैलास खटाणे आदी उपस्थितीत होते.

याप्रसंगी सुधाकर होन म्हणाले, जेऊर कुंभारी येथील ग्रामस्थ बर्‍याच दिवसांपासून गावात अ‍ॅरो प्लांट व्हावा यासाठी मागणी करत होते. याच अनुषंगाने गिरमेवस्ती शाळा या ठिकाणी नवीन प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे.लवकरच ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळेल. कामाबद्दल सर्वांनीच ना.आशुतोष काळे व अनुसया होन यांना धन्यवाद दिले. सुत्रसंचालन बापुराव वक्ते, कल्याणराव गुरसळ यांनी केले व आभार पाटीलबा वक्ते यांनी मानले.

Related Stories

No stories found.