
जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari
कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील जेऊर कुंभारीत (Jeur Kumbhari) 5 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास समाधान भागवत गुडघे यांच्या राहत्या घरी चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी दाराची कडी उघडुन घरात प्रवेश करत 90 हजाराची दिड तोळ्याचे मणिमंगळसुत्र, सहाभार ब्रेसलेटसह चांदीचे, दागिने (Gold Jewelry), 9 हजार रूपये दिड ग्रॅम कानातले, रोख रक्कमेसह एक किमती मोबाईल असा ऐवज चोरून (Theft) नेला आहे.
समाधान गुडघे कटुंब पहाटेच्या साखरझोपेत असताना ही चोरी (Theft) झाली. सकाळी 6 वा उठल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. कपाटातील सगळ्या वस्तु अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्याने ते हतबल झाले. तसेच चोरांनी जवळच चिकूच्या बागेत काही कपडे व वस्तु टाकून दिल्या. ही चोरीची (Theft) बातमी संपूर्ण गावात वार्यासारखी पसरली. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झालेले आहे.
दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली आहे. विहिरीने तळ गाठला आहे रब्बीचे पिके कशी वाचवायची असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यात गावामध्ये छोट्या मोठ्या चोरीनंतर चोरीनी घरफोडीचे (Burglary) सत्र सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाला आहे. समाधान गुडघे यांनी या संदर्भात कोपरगाव शहर पोलिस स्टेशनला (Kopargav Police Station) तक्रार दाखल केली आहे.