जेऊर हैबती मुरमाची चोरीचा पंचनामा करतांना महसूल कर्मचाऱ्यांची ग्रामस्थांना कानफाड फोडण्याची भाषा

जेऊर हैबती मुरमाची चोरीचा पंचनामा करतांना महसूल कर्मचाऱ्यांची ग्रामस्थांना कानफाड फोडण्याची भाषा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील जेऊर हैबती शिवारातील नदीकाठच्या देवस्थान इनामी असलेल्या सरकारी मालकीच्या जमिनीतून सुमारे 150 ब्रासहून अधिक मुरूमाचे बेकायदा उत्खनन करून गौण खनिज चोरून नेण्यात आल्याची तक्रार जेऊर हैबती ग्रामस्थांनी नेवाशाच्या तहसिलदारांकडे केल्या नंतर महसूल यंत्रणा खडबडून जागी झाली असून तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांचे आदेशाने आज मंगळवार दि.29 जून रोजी मंडल अधिकारी व तलाठी यांनी सदर उत्खनन केलेल्या जागेचा पंचनामा केला.मात्र यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना या महसूल कर्मचाऱ्यांनी त्याच वेळेस आम्हाला सांगायचे ना...याचे कानफाड फोडा ओ" अशी अत्यन्त हीन भाषा वापरली आहे.

जेऊर हैबती येथील रामबाबा देवस्थानच्या भोवतलाच्या नदीकाठा जवळचा मुरूम जेसीबी व ट्रॅक्टर ट्रॉल्यांतून नेण्यात आला आहे. त्यासाठी सरकारी या जमीनीत सहा ते सात फुटांपर्यंत खडडे करण्यात आले आहेत.ग्रामस्थांकडेे मुरूमाची चोरी करणारे जेसीबी यंत्र व ट्रॉल्यांचीही नावानिशी व छायाचित्रे पुराव्यानिशी उपलब्ध असल्याने सरकारी मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावण्यात येऊन चोरलेला मुरूम जेऊर हैबती शिवारातच वापरण्यात आला आहे.या प्रकरणी महसूल यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकारयांनी प्रत्यक्षात पाहणी करून पंचनामा करावा व संबंधीतांसह स्थानिक सरकारी यंत्रणेवरही कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी नेवासा तहसीलदार यांचे कडे केली होती. याबाबदच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्यावर महसूल यंत्रणा खबडून जागी झाली. मंगळवार दि.29 रोजी कुकाणा विभागाचे मंडल अधिकारी व तलाठी यांनी सदर उत्खनन झालेल्या जागेचा पंचनामा केला आहे.मात्र यावेळी उपस्थित असलेले ग्रामस्थ माहिती देत असतांना महसूल कर्मचारी त्यांना म्हणाले,"त्याच वेळेस आम्हाला सांगायचे ना....याचे कानफाड फोडा ओ" अशी अत्यन्त हीन भाषा वापरली.त्याचा व्हिडीओ ग्रामस्थांनी पत्रकारांना दिला आहे.

या प्रकरणी कुकाण्याचे मंडलाधिकारी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठांना अहवाल सादर केला असुन उत्तखनन केलेली जमिन प्रत्यक्षात सरकारी की खाजगी याचे प्रत्यक्षात पुरावेच दिसुन येत नाहीत त्यामुळे हद्द निश्चित झाल्यानंतरच कायदेशिर कारवाई करता येईल. देवस्थान भोवती मातीचे उत्खनन मात्र झालेले असुन ती माती शेती सुधारणे कामी नेण्यात आल्याचे स्थानिक चोैकशीतुन समजले आहे असे अहवालात नमुद केल्याचे आहे. मात्र ही जागा सरकारीच आहे यावर तक्रारदार ठाम आहेत.जेसीबी यंत्र व ट्रॅक्टर ताब्यात घेतल्यानंतरच खरी वस्तुस्थिती उघड होणार आहे.

कानफाड फोडण्याची भाषा वापरल्या बाबद मंडल अधिकारी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,आम्ही पंचनमा करीत असतांना तिथे पाच-सहा मुलं व्हिडीओ शूटिंग करीत होते. शूटिंग करू नका एवढेच त्यांना सांगितले.

मंडल अधिकारी व तलाठी हे आज जेऊर मध्ये बेकायदा मुरूम चोरीचा पंचनामा करण्यासाठी आले होते.त्यावेळी आमचे काही लोक तिथे उपस्थित होते.या मुरूम चोरीची माहिती देत असताना या महसूल कर्मचऱ्याना त्यांना कानफाड फोडण्याची भाषा वापरली.वास्तविक लोकसेवकाने नागरिकांना दम देणे,अर्वाच्य भाषा वापरणे बरे नाही.आम्ही या कृतीचा निषेध करतो. अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तहसीलदारांनी कारवाई करावी अन्यथा आम्ही आंदोलन करू.

- बाळासाहेब फुलमाळी, तक्रारदार, जेऊर हैबती

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com