
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
नेवासाा तालुक्यातील जेऊर हैबती येथील रामबाबा मंदिर परिसरात मुरूम व मातीचे बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी प्रशासनाकडून उत्खनन करणार्यांवर कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्ध व महसूल अधिकार्यांनाच तातडीने निलंबित करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रपिता म. गांधी जयंतीच्या दिवशी शनिवार दि.2 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचे लेखी निवेदन सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब फुलमाळी यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
बेकायदा उत्खनन करून शेकडो ब्रास मुरूम व मातीची चोरी केलेली असून ग्रामस्थांनी चोरी करणारांची नावे व यंत्राचे नंबर देऊनही महसूल प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसून उलटपक्षी आंदोलकांनाच दमबाजी करत असल्याचा आरोप करून या महसूल अधिकार्यांनाच निलंबित करण्याची मागणी केली आहे.