जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांकडून योजनेतील गावांची पाहणी

मिरी - तिसगाव पाणी योजनेतील 9 गावांचे सर्वेक्षण
पाणी पुरवठा
पाणी पुरवठा

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्‍या मिरी - तिसगाव नळ योजनेत नव्याने समाविष्ट झालेल्या नऊ गावांच्या साठवण टाकीच्या जागेचे अंतिम ठिकाण निश्चित करण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी तसेच माजी सभापती संभाजी पालवे, लाभधारक गावचे सरपंच राजेंद्र पाठक व सर्वेअर यांच्या उपस्थितीत नवीन टाकीच्या जागेचे सर्वेक्षण केले. त्यांनी पाहणी करून जागा निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे.

या योजनेत पश्चिम भागातील तेरा गावांपैकी चार गावे समाविष्ट झाली होती परंतु नऊ गावे यापासून वंचित राहिली होते. माजी सभापती पालवे यांनी या नऊ गावांसाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. प्रसंगी कार्यकारी अभियंता मुळे यांना या गावची परिस्थिती, दुष्काळाची परिस्थिती, टँकरची परिस्थिती, पाच वर्षांचा आराखडा, पाण्यावर होणारा एकूण खर्च याची सविस्तर माहिती देऊन राहिलेली नऊ गावे समाविष्ट करण्यास भाग पाडले.

आज त्या नऊ गावांच्या साठवण टाकीच्या जागा निश्चित करण्याकरिता संबंधित ठेकेदार व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांच्या समवेत नऊ गावांचा सर्वे केला. या सर्वेमध्ये डमाळवाडी, पवळवाडी, सातवड, शिरापूर, करडवाडी, घाटशिरसचा समावेश असून राहिलेल्या गावांचा एक-दोन दिवसांत सर्व्हे होणार असल्याची माहिती पालवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com