जीप पलटी होऊन बाजार समिती संचालक शिंदे ठार

तीसगाव परिसरात पहाटे घटना
जीप पलटी होऊन बाजार समिती संचालक शिंदे ठार

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा नामांकित पहिलवान संजय सदाशिव शिंदे यांचे रविवारी पहाटे रस्ते अपघातात निधन झाल्याची घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. स्व.शिंदे हे अहमदनगरहून आपल्या गावी तालुक्यातील जुने दहिफळ येथे आपल्या बोलेरो जीप मधून निघाले असताना तीसगाव ते वृद्धेश्वर कारखान्याच्या दरम्यान रस्त्यावर आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटून बोलेरो जीप पलटी झाली.

सदरची घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तसेच पहाटे फिरण्यासाठी येणार्‍या लोकांनी मदत कार्य केले. त्यांना उपचारासाठी तीसगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. स्व.शिंदे हे जुने दहिफळचे माजी सरपंच होते. ते 52 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, दोन भाऊ असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com