राहाता |तालुका प्रतिनिधी|Rahata

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. मात्र ओबीसींचे आरक्षण कमी न करता किंवा ओबीसी आरक्षणात

ढवळाढवळ न करता त्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली.

राहाता येथील सिध्द संकल्प लॉन्समधे राज्यस्तरीय तेली समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. अभिजीत वंजारी, माजी खा. सुरेशराव वाघमारे, माजी आ. शिवाजीराव चोथे, अनिल देवतारे, प्रदेशाध्यक्ष विक्रांत चांदवडकर, जिल्हाध्यक्ष राजेश लुटे. शिरीष चौधरी, दिलीप दारूनकर, दास लुटे आदी पदाधीकारी यावेळी उपस्थीत होते. तसेच राहाता शहरात संत जगनाडे महाराज मंदिराचे भुमीपुजनही मान्यवरांच्या उपस्थीत पार पडले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची किंचीतही आडकाठी नाही. त्यांना आरक्षण जरूर मिळावे परंतु ओबीसीचे आरक्षण कमी न करता किंवा ओबीसी आरक्षणात ढवळाढवळ न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नसल्याचे क्षीरसागर यांनी म्हटले. तेली समाज राज्यभर मोठ्या प्रमाणावर असून देखील तो विखुरलेला असून तो संघटीत व्हावा यासाठी अनेक दिवसापासून प्रयत्न सुरू आहे.

त्या समाजाला एकत्र करण्यासाठी साईबाबांच्या भुमीत समाजाचा राज्यव्यापी मेळावा आयोजीत केला आहे. समाजासमोर अनेक प्रश्न आहेत विशेष वोबीसी समाजाची जनगणना व्हावी. केंद्राचे 27 टक्के जे आरक्षण आहे त्याच्यामधे रोहीनी आयोग बसवला असून तो अंतीम टप्प्यात आहे.त्यामध्ये अतिमागासवर्गीय म्हणून वर्गीकरण होते. त्यात तेली समाजाचा समावेष करावा. समाजातील सुशीक्षीत बेकार जे आहेत त्यांना संधी मिळण्याकरिता वेगवेगळ्या स्तरावर विविध कार्यक्रम राबविली जावीत, असे त्यांनी यावेळी सांगीतले.

यावेळी नविन प्रांतीक अध्यक्ष म्हणून विजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यभर समाज संघटन व मेळाव्याचे पुढील काळात नियोजन करण्याचा ठराव करन्यात आला. हुशार व गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करण्याचा ठराव, पुणे जिल्ह्यातील सुंदबरे येथील संत जगनाडे महाराजांच्या मंदिरास शंभर वर्ष पुर्ण झाली मोठा सोहळा केला जाणार. जुन्या चाली रिती म्हणजे साखरपुडा बंद करन्याचा निर्णय या राज्य स्तरीय मेळाव्यात एकमुखी घेण्यात आला.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी बद्रीनाथ लोखंडे, श्री. कसबे, कैलास बनसोडे, विजय काळे, सोमनाथ देवकर, सचिन लोखंडे, अमित महाले, प्रसाद महाले यांनी विशेष परीश्रम घेतले.