जायकवाडी सिंचन प्रकल्पाच्या अधिकार्‍यांकडे शेतकर्‍यांकडून तक्रारींचा पाऊस

भालगाव-गोधेगावच्या शेतकर्‍यांची अधिकार्‍यांनी घेतली पुन्हा भेट
जायकवाडी सिंचन प्रकल्पाच्या अधिकार्‍यांकडे शेतकर्‍यांकडून तक्रारींचा  पाऊस

नेवासा बुद्रुक |वार्ताहर| Newasa Budruk

जायकवाडी सिंचन प्रकल्पातील (Jayakwadi Irrigation Project) शेतकर्‍यांच्या तक्रारी (Complaints of farmers) समजून घेण्यासाठी जायकवाडी प्रकल्पाच्या उपविभागीय अधिकारी अविनाश पांडुळे (Avinash Pandule, Sub-Divisional Officer, Jayakwadi Project) यांनी काल पुन्हा भालगाव व गोधेगाव येथील शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या. शाखाधिकारी श्री. बोडखे त्यांचेसमवेत होते. यावेळी शेतकर्‍यांनी तक्रारींचा पाऊसच पाडला.

नविन पाणी परवानगीसाठी (New water allowed) असंख्य शेतकर्‍यांकङून दहा हजार रूपये घेण्यात आले. त्याचा शासनाकडे भरणा केला गेला नाही. अनेकांना पैसे भरल्याच्या पावत्या दिल्या गेल्या नाहीत. साखर कारखान्याकङून पाणीपट्टी कापल्या गेलेल्या रकमेच्या पावत्या देखील दिल्या नाहीत. गोधेगावमध्ये 338 शेतकर्‍यांकडून रोख रकमा घेतल्या त्याच्या पावत्या दिल्या नाहीत. शासनाने पाझरपट्टी बंद केलेली असली तरी अधिकार्‍यांनी त्या नावाखाली पैसे लुटून शेतकर्‍यांची लूट केली. अशा विविध तक्रारी शेतकर्‍यांनी केल्या.

गेल्या गुरुवारी काही शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्यानंतर काल मंगळवारी पुन्हा श्री. पांडुळे यांनी या भागात भेट देऊन शेतकर्‍यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

कारखान्याकडून व रोख घेतलेल्या रकमेच्या पावत्या (Amount Bills) लवकरात लवकर संबंधीत शेतकर्‍यांना द्याव्यात अन्यथा या अधिकार्‍यांना गाव बंदी करू ,असा इशारा ग्रामस्थांनी (Hint Villagers) दिला.

यावेळी समर्पन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष राहूल चिंधे, जगन्नाथ कोरडे, भानुदास मते, निजाम शेख, राजेद्र गोलांडे, रामेश्वर तनपूरे, रामेश्वर कोरडे, बाळकृष्ण भागवत, प्रशांत तनपुरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कर्मचार्‍यावर कारवाईसाठी शेतकरी ठाम

एका कर्मचार्‍याने पैसे घेतले मात्र पावत्या कधी दिल्या नाहीत असा आरोप शेतकर्‍यांनी त्या कर्मचार्‍याचे नाव घेऊन केला. ‘त्या’ कर्मचार्‍याला मग अधिकार्‍यांनी बोलावले. तीन तास वाट बघूनही तो आला नाही. शेवटी अधिकार्‍यांना ग्रामस्थांनी तो आल्याशिवाय जाऊ देणार नाही असे सांगितल्यावर तो कर्मचारी आला. त्याने ग्रामस्थांचे आरोप नाकारले. त्याच्यावर कारवाई झाली नाही तर जायकवाडीच्या सर्व कर्मचार्‍यांना गाव बंद करू,असा इशारा यावेळी देण्यात आला.

खात्याअंतर्गत चौकशी करून कारवाई करू

शेतकर्‍यांच्या पावत्या न मिळाल्याच्या तक्रारींबाबत अहवाल तयार करून कर्मचार्‍यावर खात्यांतर्गत त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन सिंचन प्रकल्पाच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी दिले. कुठल्याही सबबीवर जायकवाडीच्या कर्मचार्‍यांकडे रोख रक्कम देऊ नये व पाणी परवाना नूतनीकरण करून घ्या, असे आवाहन जायकवाडी सिंचन विभागाचे उपविभागीय अधिकारी अविनाश पांडुळे यांनी शेतकर्‍यांना केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com