जायकवाडीच्या उपयुक्त साठ्यात वाढ, वाचा आजचे अपडेट

जायकवाडीच्या उपयुक्त साठ्यात वाढ, वाचा आजचे अपडेट

शेवगाव | शहर प्रतिनिधी

पावसाने उघडीक दिल्याने नगर (Ahmednagar) व नाशिक (Nashik) जिल्ह्यातील धरणामधून (Dam) सध्या कमी प्रमाणात विसर्ग सुरु आहे. गोदावरीच्या (Godavari River) विसर्गातही कधी खंड तर कधी सुरु अशी स्थिती असून सध्या गोदावारीतून जायकवाडीच्या (Jayakwadi Dam) दिशेने विसर्ग सुरु असून इतर ठिकाणचे ही पाणी जायकवाडी जलाशयात (Jayakwadi Reservoir) दाखल होत आहे.

रविवारी सकाळी जायकवाडीचा (Jayakwadi Water Update) उपयुक्त साठा ८१.१० टक्यापर्यंत जावून पोहचला आहे. नजीकच्या मराठवाड्यासह (Marathwada) जिल्ह्यातील शेवगाव (Shevgoan), नेवासा (Newasa), पाथर्डी (Pathardi), आदी तालुक्यांची जीवन रेखा असलेल्या जायकवाडी जलाशयात मुक्त पाणलोटातील पाणी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने यंदा जायकवाडीत चांगले पाणी दाखल झाले आहे.

मागील २४ तासात जायकवाडी जलाशयात १.३ टीएमसी नवीन पाणी दाखल झाले असून आज सकाळी ६ च्या आकडेवारी नुसार जलाशयातील एकूण पाणी साठा ८८.२३८१ टीएमसी ८५.८९ टक्के तर उपयुक्त पाणीसाठा ६२.१७५१ टीएमसी ८१.१० टक्के पर्यंत जावून पोहचला असून या पुढील काळातही पावसाचा अंदाज जाणकार व्यक्त करीत असल्याने या जलाशयातील पाणी साठा अजून वाढणार आहे. परिसराची जीवनवाहीनी म्हणून ओळख असलेल्या जायकवाडी जलाशयात समाधानकारक पाणी साठा उपलब्ध होत असल्याने या जलाशयावर अवलंबून असलेल्या शेतक-यातून समाधान व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.