दारणातून विसर्ग,  जायकवाडीत 52 टक्के साठा

दारणातून विसर्ग, जायकवाडीत 52 टक्के साठा

उपयुक्त साठा 40.29 टीएमसी, नांदूरमधमेश्वर मधून गोदावरीत 2018 क्युसेकने विसर्ग

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

भाम (Bham) मधून 880 क्युसेक, भावलीतून (Bhavali) 208 क्युसेक पाणी दाखल होत असल्याने दारणातून (Darna) काल 1871 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. हे पाणी काल रात्री 9 वाजता नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात (Nandurmadhameshwar Dam) दाखल झाल्याने या बंधार्‍यातून जायकवाडीच्या (Jayakwadi) दिशेने गोदावरीत (Godavari) 2018 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. खाली जायकवाडी जलाशयात (Jayakwadi Reservoir) काल सायंकाळी 6 वाजता उपयुक्त साठा 52.48 टक्के झाला होता. जायकवाडीत (Jayakwadi) 24 तासांत जवळपास 3 टीएमसी पाण्याची आवक झाली.

जायकवाडीत मराठवाड्यातील भगुर (Bhagur), मालुंजा (Malunja), शिवनानदी (Shivna River) भागातून पाण्याची चांगली आवक झाली. गोदावरीवरील (Godavari) नागमठाण (Nagamthan) सरिता मापन केंद्र भागातून, नांदूरमधमेश्वर (Nandurmadhameshwar) मधुन, तसेच प्रवरेवरील (Pravara) देवगड (Devgad) भागातून पाण्याची आवक दाखल होत होती. त्यामुळे बुधवारी सकाळी 6 ते गुरुवारी सकाळी 6 वाजे पयर्ंत या 24 तासांत जायकवाडी (Jayakwadi) जलाशयात 2.8 टीएमसी पाण्याची नवीन आवक झाली. ही आवक जवळपास 3 टीएमसी च्या जवळपास आहे.

त्यामुळे गोदावरी जलाशयाचा साठा (Godavari Storage) फुगत आहे. काल सायंकाळी 6 च्या मिळालेल्या आकडेवारी नुसार जायकवाडी मध्ये 52.48 टक्के उपयुक्त साठा झाला होता. हे पाणी 40.29 टीएमसी इतके आहे. काल सायंकाळी या जलाशयात 14 हजार 814 क्युसेक ने पाणी दाखल होत होते. समन्यायी पाण्याच्या नियमानुसार जायकवाडी च्या जलाशयात अजुन 9.8 टीएमसी पाण्याची गरज आहे. 50 टीएमसी पाणी झाल्यास जायकवाडीला नगर, नाशिक च्या धरणांमधुन पाणी सोडण्याची गरज राहाणार नाही.

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) दारणा धरणातुन (Darna Dam) काल सकाळी 6 वाजता 1100 क्युसेक ने विसर्ग सोडणे सुरु होते. परंतु नंतर हा विसर्ग तीन तासांनी हा विसर्ग 1871 क्युसेक इतका करण्यात आला. दारणात भाम धरणातुन 880 क्युसेक, भावलीतून (Bhavli) 208 क्युसेकने कडवातून 250 क्युसेकने विसर्ग दाखल होत होता. 24 तासात दारणात 109 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्यामुळे या दारणातुन विसर्ग वाढविण्यात आला. काल सकाळी दारणा (Darna) 96.28 टक्के भरलेले होते. काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत 23 मिमी, घोटी 47 मिमी, घोटी 44 मिमी, तर भावली परिसरात 56 मिमी पाऊस झाला.

दारणातील 1871 क्युसेक ने सुरु असलेला विसर्ग त्यात या धरणाच्या खाली वालदेवीतील 65 क्युसेक चा विसर्ग दाखल होत असल्याने हा सर्व एकत्रित विसर्ग नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने काल रात्री 9 वाजता 505 क्युसेकने सरु असलेल्या गोदावरीतील विसर्ग वाढवून तो 2018 क्युसेक इतका करण्यात आला. त्यामुळे गोदावरीत पाणी वाढले आहे. काल सकाळी 6 पर्यंत एक जून पासुन गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 5.7 टीएमसी पाण्याचा एकूण विसर्ग करण्यात आला आहे.

दुसरीकडे गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणलोटात पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. गंगापूरचा पाणीसाठा (Gangapur Water Storage) 91.88 टक्के इतका आहे. गंगापूर मध्ये 24 तासांत अवघा 17 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. मात्र यातुन विसर्ग सुरु नाही.

जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात सध्या चालू असलेल्या पावसामुळे, जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठा 40 टीएमसीपेक्षा जास्त, म्हणजे 52 टक्क्यांच्यावर पोहचला आहे. अजूनही धरणात पाण्याची आवक चालू आहे. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांत 80 टक्केच्या आसपास पाणीसाठा झालेला आहे. मात्र सध्या पावसाचे प्रमाण फारसे समाधानकारक नाही. त्यामुळे धरणातील साठे 100 टक्के होऊ शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर जायकवाडी तसेच नगर, नाशिक मधील धरणातील पाणी साठ्याची स्थिती पहाता, यावर्षी जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची वेळ येणार नाही, असे सध्याचे चित्र आहे.

- उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com