जायकवाडी आज निम्मे भरणार

36 हजार क्युसेकने पाण्याची आवक
जायकवाडी आज निम्मे भरणार
जायकवाडी धरण

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi Dam) स्थानिक पाणलोट क्षेत्र आणि नगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) शेवगाव (Shevgav), नेवाशात (Newasa) पाऊस होत असल्याने जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) 36044 क्युसेकने नव्याने पाणी दाखल होत असल्याने हे धरण (Dam) आज गुरूवारी निम्मे भरणार आहे. या धरणात या हंगामात प्रथमच विक्रमी पाण्याची आवक सुरू झाली आहे.

जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) गतवर्षीचा साठा (Storage) बर्‍यापैकी शिल्लक असल्याने हे धरण लवकर ओव्हरफ्लो होईल असे वाटत होते. नगर (Nagar) आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यातून या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जात असते. पण यंदा जायकवाडीकडे (Jayakwadi) फारसे पाणी गेले नाही. गतवर्षी हे धरण या तारखेला 99 टक्के भरले होते. नाशिकमधूक (Nashik) काही प्रमाणात तसेच शेवगाव (Shevgav), नेवाशा (Newasa) तालुक्यात पाऊस झाल्याने हे पाणी जायकवाडीत दाखल होत आहे.

काल सकाळी सहा वाजता या जलाशयात 16 हजार 325 क्युसेकने पाण्याची आवक होत होती. काल सायंकाळी 6 वाजता आवक वाढली. काल सायंकाळी 36044 क्युसेक ने नव्याने पाणी जायकवाडी जलाशयात दाखल होत होते. काल सकाळी संपलेल्या मागील 48 तासांत जायकवाडीत जवळपास 2 टीएमसी नव्याने पाणी दाखल झाले. नेवासा भाग, नागमठाण परिसर त्याच बरोबर लासुर भागातील शिवना नदी (Shivna River) दुथडी भरुन वाहत असल्याने हेही पाणी जायकवाडी जलाशयात दाखल होत आहे. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून 505 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. छोटे मोठे ओढे नाले, छोट्या नद्यांचे पाणी गोदावरीत (Godavari) दाखल होत आहे.

काल सायंकाळी 6 च्या आकडेवारीनुसार 1511.34 फुट पाणीसाठा झाला होता. तर उपयुक्तसाठा 37.7 टीएमसी इतका झाला आहे. 49.61 टक्के साठा जायकवाडीत झाला आहे. पाण्याची आवक पाहता आज गुरूवारी सकाळपर्यंत हे धरण निम्मे भरलेले असेल.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण (Darna Dam) काल सकाळी 95.03 टक्क्यांवर पोहचले. गंगापूर धरण (Gangapur Dam) 91.58 टक्क्यांवर स्थिर आहे. काल दिवसभर किरकोळ स्वरुपाचा पाऊस होता. गोदावरीत 505 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

नाशिकच्या दारणा तसेच गंगापूर समुहाच्या पाणलोटात पाऊस यंदा फारसा समाधान देणारा नाही. त्यामुळे केवळ धरणांचे साठे हळु हळु फुगत आहेत. परंतु म्हणावा असा विसर्ग करण्यात इतपत पावसाचा जोर नाही. 20 ते 22 टीएमसी पाण्याचा विसर्ग करणार्‍या दारणातुन अवघा 3.4 टीएमसी इतका करण्यात आला आहे. खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातुन गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने काल पर्यंत अवघा 5.6 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा 88.81 टक्के पाणीसाठा कालच्या तारखेला होता. तर यावर्षी काल अखेर 75.62 टक्के पाणीसाठा आहे.

दारणाच्या भिंतीजवळ अवघा 18 मिमी, पाणलोटातील घोटी येथे 26 मिमी, इगतपूरीला 21 मिमी असा पाऊस नोंदला गेला. भावलीतून 73 क्युसेक, भाम मधुन 210 क्युसेक विसर्ग सुरु आहे. त्यामुळे दारणात 24 तासांत 124 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. त्यामुळे दारणाचा साठा 95.03 टक्क्यांवर पोहचला आहे. 7149 क्षमतेच्या दारणात 6794 दलघफू इतका पाणीसाठा आहे. 1 जून पासुन या धरणात 9.3 टीएमसी पाण्याची आवक झाली. त्यातील 3.4 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दारणाच्या वरील भावली 100 टक्के असल्याने त्यातून 73 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. काल या धरणाच्या सकाळी संपलेल्या 24 तासात या धरणाच्या पाणलोटात 23 मिमी पावसाची नोंद झाली. एकूण पाऊस 2961 मिमी इतका 1 जून पासुन पडला आहे.

गंगापूर धरणाचासाठा (Gangapur Dam water Storage) 91.58 टक्क्यांवर स्थिर आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासात या धरणाच्या पाणलोटात गंगापूरला 25 मिमी, त्र्यंबकला 22 मिमी, अंबोलीला 34 मिमी, नाशिक ला 27 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर मध्ये 24 तासात अवघे 32 दलघफू नविन पाणी दाखल झाले. या धरणातुन 440 दलघफू पाण्याचा विसर्ग यापुर्वी करण्यात आला आहे. या समुहातील कश्यपी 68.63 टक्के, गौतमी गोदावरी 74.46 टक्के इतके भरले आहे.

अन्य धरणांचे साठे असे- मुकणे 58.67 टक्के, वाकी 57.02 टक्के, भाम 100 टक्के, कडवा 98.93 टक्के, आळंदी 100 टक्के, भोजापूर 23.55 टक्के, पालखेड 88.67 टक्के.

गोदावरी कालव्यांवरील पाऊस- पाऊस मिमी मध्ये- देवगाव 65, ब्राम्हणगाव 55, कोपरगाव 47, पढेगाव 59, सोमठाणा 30, कोळगाव 55, सोनेवाडी 22, शिर्डी 36, राहाता 37, रांजणगाव 32, चितळी 45 असा पाऊस नोंदला गेला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com