माका येथील जवान नवनाथ भुजबळ यांचे जम्मूमध्ये हृदय विकाराने निधन

माका येथील जवान नवनाथ भुजबळ यांचे जम्मूमध्ये हृदय विकाराने निधन

नेवासा lतालुका प्रतिनिधीl Newasa

तालुक्यातील माका येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान नवनाथ रभाजी भुजबळ (वय 35 वर्षे) यांचे आज लेह (जम्मू) येथे हृदविकारने निधन झाले.

जवान नवनाथ यांचे कुटुंबियांनी दिलेल्या माहिती नुसार नवनाथ हे 15 दिवसांपूर्वी माका येथून ड्युटीवर गेले होते. कालच त्यांची चंदीगड हुन जम्मूला बदली झाली होती. लेह मधील त्यांचा ड्युटीचा आजचा पहिलाच दिवस होता.

आज सोमवारी दि.10 मे रोजी सकाळी 6 वाजता सैन्य दलाकडून नवनाथच्या कुटुंबियांना मोबाईलवर फोन आला असता त्यांनी नवनाथचा हृदय विकाराचे झटक्याने निधन झाल्याचे कळविले. जम्मूहुन विमानाने पुण्याला व पुण्याहुन लष्करी वाहनाने जवान नवनाथचा मृतदेह माका (ता.नेवासा) येथे आणला जात आहे.

त्याचे मागे आई-वडील, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. जवान नवनाथ भुजबळच्या निधनाने माका गावावर शोककळा पसरली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com