जवाहर नवोदय विद्यालयातील करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला

जवाहर नवोदय विद्यालयातील करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरमधील जवाहर नवोदय विद्यालयातील करोना बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. सोमवारी सकाळी प्राप्त तपासणी अहवालांमध्ये 19 तर सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात 12 विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्गाचे निदान झाले. यामुळे बाधितांची संख्या 82 झाली आहे. दरम्यान समूह संसर्गामुळे बाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जवाहर नवोदय विद्यालयातील करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला
टाकळीच्या जवाहर नवोदय विद्यालयातील करोना बाधितांचा आकडा वाढताच; आणखी...

दरम्यान, करोना बाधित अहवाल प्राप्त झाल्यानंतर खबरदारी म्हणून 66 विद्यार्थ्यांचे स्त्राव नमुने ओमिक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. 483 विद्यार्थी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात आतापर्यंत 82 विद्यार्थी व कर्मचारी बाधित झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. अद्यापही काही अहवाल प्रलंबित असल्याचे तालुका आरोग्य आधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी सांगितले.

जवाहर नवोदय विद्यालयातील करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला
31 डिसेंबरला रात्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी बंद

बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने 15 दिवसांसाठी हे विद्यालय प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे. विद्यालयात बांधीत विद्यार्थी वाढत असल्याने पालक वर्ग चिंतेत आहे. प्रशासनाकडून सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे कळविले जात आहे.

नवोदय विद्यालयातील करोना संसर्ग झालेल्यांपैकी 66 विद्यार्थ्यांचे नमुने जिल्हा रूग्णालयातून पुणे येथील प्रयोगशाळेत ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचा अहवाल दोन दिवसांत अपेक्षित आहे.

- डॉ. भूषणकुमार रामटेके, जिल्हा शल्यचिकित्सक.

जवाहर नवोदय विद्यालयातील करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला
शिर्डीत विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची अज्ञातांकडून विटंबना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com