आणखी आठ विद्यार्थ्यांना करोनाची बाधा

टाकळीच्या नवोदयमधील रुग्णांची संख्या 90
आणखी आठ विद्यार्थ्यांना करोनाची बाधा

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील करोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. मंगळवारी आणखी आठ नवे करोना बाधित आढळले आहेत.

टाकळी ढोकेश्वर येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात गेल्या चार-पाच दिवसांपासून करोना बाधित विद्यार्थी व कर्मचारी आढळत आहेत. मंगळवारी पुन्हा नव्याने आठ जणांना करोनाची बाधा झाल्याचा अहवाल मिळाला असून बाधितांचा एकूण आकडा 90 झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली. दरम्यान टाकळी विद्यालयात विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाल्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. विद्यालयाच्या बेफिकीरपणामुळेच विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाल्याचा आरोप मंगळवारी काही पालकानी केला आहे. त्यावर विद्यालय प्रशासनाच्यावतीने काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानूसार सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेत आहोत, पालकानी काळजी करु नये. सतत विद्यार्थ्यांच्या जवळ येवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी टाकळी येथील नवोदय विद्यालय येथे पारनेरचे तहसिलदार शिवकुमार अवळकंठे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. संदीप सांगळे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लाळगे यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी भेट देत विद्यालयाची पाहाणी करुन विद्यार्थी व कर्मचारी यांचा आढावा घेतला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ, लाळगे यांनी सांगितले, पुणेच्या प्रयोग शाळेत पाठविलेले स्त्रावाचा अहवाल आज (बुधवारी) किंवा गुरुवारी मिळणार आहे. दरम्यान उपचार घेत आसलेल्या सर्व मुलाची प्रकृती उत्तम असून मुलाची पुरेपुर काळजी घेतली जात आहे.

आम्ही आमच्या मुलांप्रमाणेच बाधित मुलांची काळजी घेत आहोत. करोना विषयाचे सर्व नियम आम्ही प्रशासनामार्फत पाळत आहोत. मुलांची विलिनीकरणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पालकांनी ही विद्यालयात जास्त येऊ नये. आम्ही सर्व परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेत आहोत.

- प्रांतधिकारी सुधाकर भोसले.

करोनाविषयी नवोदय विद्यालयात सर्व नियम पाळण्यात येत आहेत. सामाजिक अंतर ठेवून मुलांची जेवणाची व्यवस्था दोन टप्प्यात करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची सोय स्वतंत्र केली आहे. मुलांना मास्क, सॅनिटाईझर देण्यात आले आहे.

- तहसीलदार शिवकुमार आवळकंठे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com