आंदोलन करणारे पक्ष व संघटनांकडूनदूध उत्पादकांची दिशाभूल - जवरे
सार्वमत

आंदोलन करणारे पक्ष व संघटनांकडूनदूध उत्पादकांची दिशाभूल - जवरे

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

दुध दर प्रश्नी सध्या परिस्थितीला देशभरासह राज्यात करोना परिस्थितीमुळे मागणी पुरवठा संतुलन जरी बिघडले असून सध्या दुध उत्पादकांना 15 ते 20 रुपये प्रति लिटर दर मिळत असल्याने संपूर्ण राज्यातला दुध उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागला असून सध्या काही पक्ष व संघटना या शेतकर्‍यांना प्रति लिटर 30 रुपये दर मिळावा, अशा मागण्या करत आंदोलन करीत आहे.

यापूर्वी शेतकर्‍यांना प्रति लिटर 32 ते 36 रुपये प्रति लिटर भाव मिळत असतांना उत्पादकांना 30 रुपये प्रति लिटर भाव मिळावा या मागण्यांसाठी आंदोलन करणारे काही पक्ष व संघटना दूध उत्पादकांची दिशाभूल करीत असल्याची टिका शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी जवरे यांनी केली आहे.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी या पूर्वी केंद्र व राज्य सरकारला गायीच्या दुधाचा उत्पादन खर्च 37.50 पैसे प्रति लिटर व म्हशीच्या दुधाला 36.03 रुपये प्रति लिटर असल्याचे आंदोलनाच्या माध्यमातून वारंवार निदर्शनास आणून दिले असतांना सध्याचे सरकार व विरोधी पक्षाचे पुरस्कृत काही संघटना व पक्ष दुधाच्या उत्पादन खर्चाच्या आत भावाची मागणी करुन दूध उत्पादकांचा विश्वासघात करुन उत्पादकांना न्याय देण्यापेक्षा पुतना मावशीचे प्रेम दाखवून आणखीन शेतकर्‍यांना कर्जाच्या खाईत ढकलण्याचे काम करीत आहे.

दि. 1 जुून रोजी संपाचे आंदोलन झाले दरम्यान कर्जमाफी बरोबर दुधाचा 3.5 व 8.5 ला 24 रुपये प्रति लिटर वरुन 27 रुपये प्रति लिटर आणि प्रति फॅट 3 रुपये अशी दरवाढ करण्यात आली होती. तसा शासन आदेश ही काढण्यात आला होता.

शासन आदेशाच्या विरुद्ध त्या वेळेचे भाजप,काँग्रेस,राष्ट्रवादी यांच्या ताब्यात असणार्‍या 15 दूध संघाने शासनाने केली दुध दरवाढ आम्हाला परवडत नाही म्हणून या आदेशा विरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल करुन शासन आदेशाला स्थगिती मिळाविली होती. ही बाब दूध उत्पादकांनी नजरेआड करुन जमणार नाही. आणि आता आंदोलने करुन उत्पादन खर्चाच्या आत 30 रुपये प्रति लिटर दराची मागणी करुन शेतकर्‍यांना बेगडी प्रेम दाखवून विविध संघटना व पक्ष शेतकर्‍यांची फसवणूक करीत असल्याचे जवरे यांनी म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com