जवळेतील शेतकर्‍यांना कुकडीचे पाणी मिळणार मोफत

जवळेेतील शेतकर्‍यांना कुकडीचे पाणी मिळणार मोफत
जवळेतील शेतकर्‍यांना कुकडीचे पाणी मिळणार मोफत
संग्रहित

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील जवळे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेने पुढाकार घेत संस्थेच्या नफ्यातून गावातील सर्व शेतकर्‍यांना कुकडीचे मोफत पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारे जवळे हे कुकडी प्रकल्प लाभ क्षेत्रातील पहिलेच गाव असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

सहकारी संस्थेने संपूर्ण जवळे गावची कुकडी प्रकल्पातून मिळणार्‍या पाण्याची 2 लाख 65 हजार रुपये पाणीपट्टी भरली आली .यावेळी शेतकर्‍यांची सुमारे एक लाख रुपयांची थकीत पाणीपट्टीही भरण्यात आली आहे. सेवा संस्थेला झालेल्या नफ्यातून याबाबतच्या निधीची तरतूद करण्यात आली. जवळे गावातील एकूण 1 हजार 700 हेक्टर बागायती शेतीला याचा लाभ होणार आहे. येथील पाणी वापर संस्थांना पाणीपट्टी वसुलीबाबत अडचणी येत असल्यामुळे जवळे ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे . संस्थेने चालू हंगामाची आगावू पाणीपट्टीही भरली आहे. आता यापुढे गावची पाणीपट्टी सेवा संस्थेकडून भरून शेतकर्‍यांना मोफत पाणी देण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव सालके यांनी सांगितले.

कुकडी डावा कालवा पाणी संघर्ष समितीने याबाबत सेवा संस्थेकडे मागणी केली होती. यावेळी गोरख पठारे, बाबाजी लोखंडे, नवनाथ सालके, बबनराव सालके, किसनराव रासकर, प्रदीप सोमवंशी, गोरख सालके, मंगेश सालके, संतोष पठारे, बाळासाहेब सालके, संदीप सालके, नाथा रासकर, सूर्यकांत सालके, संपत आढाव, पांडुरंग कोठावळे, ज्ञानदेव पठारे, सतीश बरशिले, प्रभाकर पठारे,वाल्मीक पठारे आदी उपस्थित होते .

जवळे ग्रामस्थांनी घेतलेला हा निर्णय एक आदर्श असून याचे अनुकरण आता कुकडी लाभक्षेत्रातील इतर सर्व गावांनी करावे. या प्रकल्पाचे समन्यायी पाणीवाटपाची मागणी करताना पाणीपट्टीचा हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून कुकडी कालवा पाणी संघर्ष समितीच्यावतीने लाभक्षेत्रातील सर्व गावांना जवळे प्रमाणे निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे .

- रामदास घावटे, अध्यक्ष कुकडी कालवा संघर्ष समिती

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com