जवळा प्रकरणाचा तपास सुरूच !

अहवालाची प्रतीक्षा : आरोपी 13 व्या दिवशीही मोकाटच
जवळा प्रकरणाचा तपास सुरूच !

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

जिल्हा हदरवून सोडलेल्या जवळा प्रकरणातील तपास पुढे सरकरण्याचे नाव घेण्यास तयार नाही. 13 दिवसांनंतर पोलीस आरोपींपर्यंत पोहलेले नाहीत. पोलीसांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत असून अद्याप नाशिक अहवाल आलेला नसल्याने पोलीस प्रतिक्षेत आहेत.

जवळा येथे 13 दिवसांपूर्वी शाळकरी मुलीची हत्या करण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार संबंधित मुलीवर अत्याचार झाला असावा, असे प्रथमदर्शनी दिसत होते. जेव्हा मुलगी मृत अवस्थेत आढळली तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. असे प्रत्यक्षात पहिल्यांदा पाहणी करणार्‍यांनी सांगितले होते. ही घटना घडून मोठा कालावधी झालेला असून आरोपी मोकाट फिरत आहेत. यामुळे ग्रामस्थात मोठा रोष निर्माण झाला आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी सांगितले, आम्ही आतापर्यत 22 जणांची चौकशी केलेली आहे. नगरच्या प्राथमिक अहवालानुसार आम्ही चौकशी करत आहोत. आम्हाला नाशिक प्रयोगशाळेतील अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, जवळा ग्रामस्थांनी आंदोलन करत या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे द्यावा, अशी मागणी ही केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com