जातप शिवारात बिबट्याची दहशत

शेळी व कालवड ठार
file photo
file photo

मुसळवाडी |वार्ताहर| Musalwadi

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) जातप (Jatap) परिसरामध्ये पंधरा ते वीस दिवसापासून बिबट्यांनी (Leopard) धुमाकूळ घातला असून एक शेळी व एक कालवड फस्त केल्याची घटना घडली आहे.

दि. 14 रोजी सायंकाळी चार ते पाच वाजे दरम्यान अनिल गोरक्षनाथ जाधव हे आपल्या शेळ्या चारून घरी जात असताना एका बिबट्याने (Leopard) वेड्याबाभळीच्या काटवनातून अचानक येऊन शेळ्यांच्या कळपातून एक शेळी (Goat) ओढून नेऊन शेजारीच असलेल्या बाभळीच्या काटवनात मारून फस्त केली. गुरूवारी पहाटे चार वाजता दत्तात्रय बाळासाहेब शिंदे यांच्या वस्तीवरील गायांच्या (Cow) गोठ्यातील पाच महिन्याची कालवडीच्या नरडीला पकडून ठार मारले.

घरातील माणसे जनावरांच्या ओरडल्यामुळे जागे झाल्याने बिबट्याने (Leopard) जवळच असलेल्या उसाच्या शेतात धूम ठोकली. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत शेळी व कालवडीचा पंचनामा केला.

पाच ते सहा दिवसापूर्वी चार कालवडीवर बिबट्याने हल्ला केला होता. तर पंधरा दिवसांपूर्वी दोन शेळ्या, पाळीव कुत्रे रात्री नऊ वाजता वस्तीवरून ओढून नेले. खरात वस्तीजवळ दुपारी कावेरी खरात या आपल्या शेतात गवत घेत असताना त्यांना अचानक समोर बिबट्या दिसला.

बिबटे मानवी वस्तीत शिरल्याने शालेय विद्यार्थी, शेतकरी महिला, मजूर वर्ग व ग्रामस्थ चांगलेच धास्तावले असून बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. त्यामुळे वनविभागाने या भागात कलवार वस्ती व शिंदे वस्ती येथे दोन ठिकाणी त्वरित पिंजरा लावण्याची मागणी सोसायटीचे अध्यक्ष परशुराम शिंदे व जालिंदर कलवार, ग्रामपंचायतचे सदस्य ताराचंद कलवार, संपतराव जाधव, प्रा. महेमूद सय्यद, जगन्नाथ गोरे, गोरक्षनाथ बोंबले, गणपत वाघमारे, गजानन शिंदे, रमेश शिंदे, प्रमोद तुपे, जयेश चोरडिया, अमोल शिंदे, तुकाराम शिंदे, गोविंद शिंदे, रियाज सय्यद, महेंद्र खरात, वेणूनाथ खरात, ताराचंद कलवार, सुनील तुपे ,अनिल तुपे, विजय शिंदे, नामदेव साठे, आदींनी वन विभागाकडे केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com