बाळ बोठेचा अटकपूर्व फेटाळला

पोलिसांना अटकेचे मार्ग मोकळे
बाळ बोठेचा अटकपूर्व फेटाळला

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्त्या, यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ.ज.बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता बोठेच्या अटकेचे मार्ग पोलिसांना मोकळे झाले आहे.

30 नोव्हेंबरला जातेगाव घाटात रेखा जरे पाटील यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केल्यानंतर पत्रकार बाळ बोठे यानेच हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले. पोलीस अटक करण्यासाठी त्यांना शोधत असतानाच त्याने कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज अ‍ॅड. महेश तवले यांच्यामार्फत दाखल केला. काल मंगळवारी बोठेचे वकिल तवले व सरकारी वकिल सतीश पाटील यांचा युक्तीवाद पूर्ण झाला. पण कोर्टाने निकाल न देता तो राखून ठेवला होता. आज जिल्हा व सत्र न्यायाधीश नातू यांनी आरोपी बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केल्याचे आदेश काढले.

...............

पोलिसांचा शोध सुरूच

बाळ बोठेला अटक करण्याचे पोलिसांचे मार्ग आता मोकळे झाले असले तरी तो अटकेच्या भितीने दडून बसला आहे. तो औरंगाबाद हायकोर्टातही अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करू शकतो असे समजते. त्यामुळे पोलीस आता त्याच्या अटकेसाठी हायकोर्टाबाहेर फिल्डींग लावण्याच्या तयारीत असल्याचे समजते. जरे यांची हत्या झाल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून बोठे हा पसार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com