
राहाता |प्रतिनिधी| Rahata
नगर-मनमाड या रस्त्याच्या (Nagar Manamad Road) कामासाठी केंद्र सरकारने (Central Government) नव्याने निविदा प्रक्रीया राबवली असून जानेवारी 2023 मध्ये मार्गाच्या कामास प्रारंभ होणार असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी दिली.
खा. डॉ. सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) म्हणाले, जानेवारी 2021 मध्ये या मार्गाकरिता पाठपुरावा करुन 430 कोटी रुपयांचा निधी (Fund) मंजूर करुन आणला होता. या निधीतून या कामाची सुरुवातही झाली होती. परंतु गुणवत्तापूर्ण काम न झाल्याने 13 जुलै 2022 रोजी या ठेकेदाराचे (Contractor) काम रद्द करण्यात आले होते. त्यानंतर कोविड संकट (Covid Crisis), अतिवृष्टी या कारणामुळे कामाला विलंब झाला. ही वस्तुस्थिती असली तरी या मार्गावरील असलेले खड्डे (Pits) बुजविण्यासाठी 8 ऑगस्ट 2022 रोजी पहिल्या टप्प्यात 8.62 कोटी रुपये आणि दुसर्या टप्प्यात 6 कोटी अशा एकूण 14.62 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणण्यात आपल्याला यश आले आहे. या निधीतूनच या मार्गावरील खड्डे (Pits) बुजविण्याचे काम 75 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम 15 डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर-मनमाड महामार्गाचा (Nagar Manmad Highway) प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी केंद्र सरकारने सर्वतोपरी सहकार्याची भूमिका घेतली असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport Minister Nitin Gadkari) यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर रस्त्याच्या कामाकरिता आता 4 नोव्हेंबर 2022 रोजी पुन्हा नव्याने 798 कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेस मान्यता मिळाली आहे. जुन्या निविदेपेक्षाही 85 टक्के जास्त निधीची ही निवीदा प्रक्रीया आता प्रशासकीय स्तरावर सुरु करण्यात आली असून डिसेंबर 2022 नंतर या रस्त्याची निवीदा प्रक्रीया पूर्ण होणार असल्याने कुठल्याही परिस्थितीत 2023 च्या पहिल्या आठवड्यात नवीन ठेकेदार नियुक्त होवून या रस्त्याचे काम सुरु होणार असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली तसेच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport Minister Nitin Gadkari) यांच्या सहकार्याने नगर मनमाड रस्त्याच्या कामास भरघोस निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.