जामखेड तालुक्यात रस्ता नसलेल्या शेतीसाठी बांधावरून मार्ग

147 अर्जांवर तातडीने उपायोजना, महसूल विभागाचा पुढाकार
जामखेड तालुक्यात रस्ता नसलेल्या शेतीसाठी बांधावरून मार्ग

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

ज्या शेतकर्‍यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ते नाहीत. रस्त्यांसाठी अडवणूक होत आहे असे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे. जामखेड तालुक्यातील 147 अर्जांवर कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. यामुळे तालुक्यातील रस्ते अडवणुकीचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.

जामखेड तालुक्यात ज्या ठिकाणी रस्ते अडवणुकीचे दावे दाखल झाले आहेत त्या सर्व दाव्यांमध्ये स्थळ निरीक्षण करून सुनावणी घेऊन सदर दावे विहित कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन महसूल विभागाने केले आहे. रस्ते हे मामलतदार न्यायालय अधिनियम 1906 कलम 5 (2) खाली जुने वाहिवाटीचे रस्ते आडवल्यास ते खुले करून देणे तसेच एखाद्या गटाला कुठेही रस्ता नसेल तर सर्वे नंबरच्या किंवा गटनंबरच्या बांधावरून नवीन रस्ता देणे याचा समावेश आहे.

जामखेड तालुक्यात असे एकूण 147 रस्त्याचे अर्ज होते .त्यामध्ये आतापर्यंत 98 ठिकाणी स्थळनिरीक्षण पूर्ण झाले असून त्यामध्ये सुनावणी सुरू झली आहे. समजुतीने रस्त्याचे प्रश्न मिटण्यासारखे आहेत ते जागेवरच मिटवण्यावर भर दिला जातो आहे. ज्या ठिकाणी ते समजुतीने मिटणार नाहीत त्याठिकाणी सुनावणी घेऊन उर्वरित सर्व प्रकरणे पुढील 3 महिन्यांत निकाली काढण्याचे नियोजन केले आहे.

कौटुंबिक वाटपचे प्रकरणे प्रलंबित आहेत. कोणत्याही व्यक्तीला त्याचे नावावर असणारी जमीन कुटुंबातील इतर घटकांच्या नावाने करावयाची असल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 खाली अर्ज करू शकतात. शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा म्हणजेच बागायत जमिनीच्या बाबतीत 20 गुंठे आणि जिरायत जमिनीच्या बाबतीत 40 गुंठे पेक्षा कमी क्षेत्राचे वाटप होणार नसल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com