पारनेर येथे जनता दरबारात 326 तक्रारींचे निवारण

आमदार लंके यांच्यासह अधिकार्‍यांनी जागेवरच घेतले निर्णय
पारनेर येथे जनता दरबारात 326 तक्रारींचे निवारण

पारनेर |प्रतिनिधी| Parner

आमदार निलेश लंके यांनी सोमवारी (दि.2) आयोजित केलेल्या जनता दरबारामध्ये विविध खात्याअंतर्गत 326 प्रश्न मार्गी लागले. लंके तसेच प्रशासकीय अधिकारी यांनी जागेवरच तक्रारींबाबत निर्णय घेतल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

पारनेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे हा जनता दरबार पार पडला. यात शेकडो तक्रार अर्ज दाखल झाले व प्रत्येक अर्जाचे संबंधित शासकीय अधिकार्‍यां समवेत सोडवणूक करण्याचा प्रयत्न आमदार लंके यांनी केला.त्यातील अनेक प्रकरणे जनता दरबारात मार्गी लावले. कोरोना महामारी मुळे गेल्या दोन वर्षांमध्ये जनता दरबार बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तक्रारींचा पाऊस या जनता दरबारात पडला. पारनेर पंचायत समितीसह पाटबंधारे विभाग, महावितरण, ग्रामपंचायत आरोग्य विभाग, पोलीस या विभागाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात लेखी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यानुसार तातडीने संबंधित विभागाच्या अधिकारांना सांगुन जास्तीत तक्रारींचा निपटारा या जनता दरबारात करण्यात आला.

जनता दरबारात आमदार निलेश लंके यांनी सर्व तक्रारीमध्ये स्वतः लक्ष घातले या वेळी त्यांच्या समवेत नायब तहसीलदार सुभाष कदम, श्रीमती पाचर्णे, गटविकास अधिकारी किशोर माने नगरपंचायतचे म्हेत्रे, विलास गायकवाड, शामराव मुळे, भाऊसाहेब पवार, एम व्ही भोसले, सुरेश भागवत, सुहास साळवे, गणेश औटी,अनिल शिंदे, आडभाई सुदामराव पवार, बापू शिर्के, बाळासाहेब खिलारी, डॉ. कावरे, सुरेखा भालेकर, अ‍ॅड राहुल झावरे, सचिन पठारे, मारुती रेपाळे, श्रीकांत चौरे, योगेश मते, भुषण शेलार, दिपक लंके, नंदकुमार औटी, बंडू साबळे, अंकुश पायमोडे, चंदु मोढवे, महेंद्र गाडेकर, बाबा नवले, सहदेव तराळ, बाळासाहेब औटी, विजय डोळे, उमा बोरुडे, दिपाली औटी, वैजंता मते, संदीप चौधरी, बाळासाहेब दळवी, सचीन नगरे, संग्राम इकडे, सचिन साठे, जगदीप साठे, विलास धुमाळ, शामराव पवार, सुनील करंजुले, सचिन ठुबे, अजिंक्य गवळी, गुंडा भोसले, महेश शिरोळे यांच्यासह शेतकरी, तक्रारदार नागरीक दरबारात उपस्थित होते.

सातबारा दुरूस्तीच्या सर्वाधिक तक्रारी

महसुल विभागाच्या वतीने गावनिहाय सातबारा ची नोंद करताना कामगार तलाठ्यांकडुन नाव दुरुस्ती व क्षेत्र दुरुस्तीची अनेक तक्रारी प्रलंबित आहे. त्यामुळे या ऑनलाईन सातबरा मध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी असल्याच्या सर्वाधिक तक्रारी शेतकर्‍यांनी या जनता दरबारात केल्या. महसूल विभागाच्या वतीने सातबारा नोंदी व दुरूस्ती, फेरफार दुरूस्ती यासह रस्ते व जमीन वाटपा संदर्भात गावागावात दरबारातील तक्रारींचा तपशील तहसील कार्यालयातील प्रकरणांपैकी सर्व प्रकरणांवर कार्यवाही झाली असून लवकरच हे सर्व प्रकरणे मार्गी लागतील असे तहसिलदार व संबधीत अधिकारी यांनी सांगीतले.

Related Stories

No stories found.