राजूर येथील बंद बाजारपेठ
राजूर येथील बंद बाजारपेठ
सार्वमत

जनता संचारबंदी : अकोले कडकडीत बंद

Sarvmat Digital

अकोले (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  ‘जनता कर्फ्यु’ ला अकोलेकरांनी उत्स्फूर्तपणे साथ दिल्याचे चित्र दिसत आहेत. सकाळी 7 वाजे नंतर शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य दिसत होते.

वृत्तपत्र व दुग्ध व्यावसायिकांनी सात वाजेच्या आत आपली कामे आटोपून जनता कर्फ्युची अंमलबजावणी केली .अकोले शहरासह तालुक्यात सर्वत्र अशा प्रकारे चित्र निर्माण झाले. कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन व सामाजिक संघटना यांनी वेगवेगळे उपक्रम राबविले व जनजागृती केली.

जनता कर्फ्युला पाठींबा देण्या ऐवजी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनांची तहसीलदार मुकेश कांबळे व पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून कसून तपासणी सुरू आहे. विनाकारण वाहने रस्त्यावर फिरविणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस व महसूल प्रशासनाने दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com