तालुका हा गट, जनता हेच आमचे चिन्ह - अ‍ॅड. काकडे

चापडगाव येथे जनशक्ती संवाद यात्रा
तालुका हा गट, जनता हेच आमचे चिन्ह - अ‍ॅड. काकडे

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

मतदार संघात आता बदल होताना आपल्याला दिसतो आहे. सोसायटी निवडणुकीत अनेक ठिकाणी जनतेने जनशक्तीला पसंती दिली आहे. हे चित्र येत्या काळात आपणास निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. जनता हेच आमचे चिन्ह आणि संपूर्ण तालुका हा आमचा गट आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड.शिवाजीराव काकडे यांनी येथे केले.

चापडगाव येथे जनशक्ती संवाद यात्रेनिमित्ताने जनशक्ती युवा विकास आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडितनाना नेमाने होते तर कार्यक्रमासाठी जि.प.सदस्या हर्षदा काकडे, जगन्नाथ गावडे, अशोकराव ढाकणे, संजय आंधळे, जनशक्तीचे नूतन उपाध्यक्ष राजू जिजा पातकळ, कार्याध्यक्ष लक्ष्मण पातकळ, सुरेश चौधरी, राजेंद्र पोटफोडे, बाळासाहेब नरके, अकबर शेख, हरि फाटे, आबासाहेब काकडे, विकास शिंदे, शामराव खरात, कॉ.राम पोटफोडे, युवा आघाडीचे अध्यक्ष तानाजी जाधव, उपाध्यक्ष अमोल पातकळ, सचिव अजय पातकळ, रघुनाथ सातपुते, नवनाथ साबळे, श्रीराम विखे, अप्सर बेग, दुर्गा रसाळ, नवनाथ खेडकर, बाळासाहेब जाधव, हरिश्चंद्र निजवे, नामदेव ढाकणे, संतोष गायकवाड, राजेंद्र गाढे, बापूराव गाढे, आण्णा गोरे यावेळी प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी अ‍ॅड.काकडे म्हणाले, आज युवकांची शाखा आपण स्थापन केली उद्या तुमच्यातूनच कुणीतरी पंचायत समिती, मार्केट कमिटीवर नेतृत्व करणार आहे. उद्याच्या काळात जनतेने ठरवायचे आहे की तुमच्यासाठी लढणारा आवाज जिवंत ठेवायचा आहे की नाही? कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पातकळ यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर गरड यांनी मानले.

युवक कार्यकारिणी जाहीर

यावेळी जनशक्तीच्या उपाध्यक्षपदी राजू पातकळ, कार्याध्यक्षपदी लक्ष्मण पातकळ, युवा आघाडीच्या अध्यक्षपदी राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष अमोल पातकळ, सचिव अजय पातकळ यांची निवड करण्यात आली व 51 युवकांची कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com