निळवंडेचा संघर्ष कृती समितीसाठी नवा नाही - जनार्दन घोगरे

निळवंडेचा संघर्ष कृती समितीसाठी नवा नाही - जनार्दन घोगरे

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यातील निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना निळवंडेचा संघर्ष नवा नाही. पन्नास वर्षापासुन पाण्यासाठी लाभक्षेत्रातील

शेतकर्‍यांना प्रस्थापितांसोबत मोठा संघर्ष कायमच वेळोवेळी करावा लागला आहे. त्यातून अनेक वेळा मोठा शारिरीक व मानसिक त्रास लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना झाला. हा संघर्ष जनु काय निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे का? असा प्रश्न वर्षानुवर्ष लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांला पडतो, अशी प्रतिक्रीया खा. लोंखडे व निळवंडे कृती सामितीच्या सदस्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याविषयी लोणी खुर्द गावाचे सरपंच जनार्दन घोगरे यांनी दिली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असुन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करुन कालव्यांच्या कामासाठी अर्थसंकल्पात 476 कोटी रुपयांची भरीव तरतूद केलेली आहे. निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची पन्नास वर्षाची पाणी येण्याची अशा पुन्हा एकदा पल्लवित झाली. निळवंडेचा फक्त राजकारणासाठी वापर काही लोकांनी वर्षानुवर्ष केला.

आज कोव्हिडची पार्श्वभूमी असताना निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या पाठपुराव्याने शासनाच्या जलसंपदा विभागाने निळवंडे डाव्या कालव्याच्या निर्मळ पिंपरी-लोणी खुर्द हद्दीतील पृच्छ काम सुरु करण्याचे आदेश दिलेले आहे. परंतु ठेकेदारांच्या वादात हे काम बंद होते म्हणून खा.लोखंडे यांनी दुपारी दोन वाजता कामाच्या साईटवर येवुन वाद मिटवुन बंद काम सुरु करुन दिले. यात गैर काय? मुळात: पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई करताना त्यातील सर्व बाजु सर्व अंगाने तपासणे आवश्यक असताना देखील लोकप्रतिनिधींसह शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करणे हे संयुक्तिक वाटत नाही.

खा. सदाशिव लोखंडे यांनी कालव्यांच्या कामासाठी मोठा पाठपुरावा केला आहे. निळवंडे कालव्याचा प्रश्न हा शेतकर्‍यांच्या जीवन मरणाचा आहे. पन्नास वर्ष लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्यावाचून वंचीत आहे.शेतकर्‍यांच्या शेतात पाणी पोहचवण्याचे उद्दिष्ट महाविकास आघाडी सरकारचे आहे. ही लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या दृष्टीने आनंददायी बाब आहे. त्यासाठी प्रयत्न करणारांवर पोलिस कारवाई होणे योग्य नाही,अशी भावना लोणी खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच जनार्दन घोगरे यांनी व्यक्त केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com