परिचारिकांच्या प्रश्‍नावर ‘जनआधार’चे झेडपीत उपोषण

परिचारिकांच्या प्रश्‍नावर ‘जनआधार’चे झेडपीत उपोषण

कोविड काळातील प्रोत्साहन भत्ता व किमान वेतनवाढ व पेन्शन योजनेची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - करोना महामारीत, सरकारी आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारी अर्धवेळ परिचारिका (nurses) यांना प्रोत्साहन भत्ता व किमान वेतन वाढ व पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सोमवारी जनआधार संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेत उपोषण करण्यात आले.

या अर्धवेळ परिचारिका दररोज 7 ते 8 तास काम करून त्यांना महिन्याला 3 हजार मानधन देण्यात येत आहे. यात केंद्र सरकारच्या वतीने 100 रुपये आणि राज्य सरकारच्यावतीने 2 हजार 900 मानधन देण्यात येत आहे. करोना (coronavirus) काळातील परिचर महिलांना प्रोत्साहन भत्ता मिळावा, किमान वेतनानुसार त्यांना लवकरात लवकर पगार वाढ मिळावी व यापुढील सर्व वेतन ऑनलाईन पध्दतीने देण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, अमित गांधी, बाळासाहेब केदारे, दीपक गुगळे, संतोष उदमले, कल्पनाताई महाडिक, सुरेखा जाधव, कुमुदिनी वंजारे, शालिनीताई लांडे, जयश्री कांबळे, उषा केदारे, प्रतिभा सोनवणे, नंदा शिंदे, योगेश सोनवणे, गणेश गायकवाड, अमोल गायकवाड, गणेश निमसे, किरण गाढवे, सिद्धांत आंधळे, किरण जावळे, उमेश करपे आदीसह परिचारिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com