जन-वन विकास योजनेत कर्जतमधील 6 गावांचा समावेश

प्रत्येक गावाला मिळणार 25 लाखाचा निधी
जन-वन विकास योजनेत कर्जतमधील 6 गावांचा समावेश

कर्जत |प्रतिनिधी\ Karjat

राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखड्याअंतर्गत वने व वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्रालगतच्या गावामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास या योजनेत कर्जत तालुक्यामधील 6 गावांचा सामावेश करण्यात आला आहे. या योजनेतून सर्व गावांना प्रत्येक 25 लाख रूपयांचा निधी मिळणार आहे.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास या योजनेत निवड झालेल्या गावांमध्ये तालुक्यातील बिटकेवाडी, चखालेवाडी, कोंभळी, खांडवी, थेरगाव चांदे खुर्द, म्हाळंगी या गावांचा समावेश आहे. आ. रोहित पवार यांनी वेळोवेळी या योजनेत कर्जतमधील गावांचा समावेश व्हावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. आणखी 4 गावांना या योजनेत समाविष्ट करावे यासाठी पवार प्रयत्नशील आहेत. त्यासंदर्भातील प्रस्तावही रेहेकुरी वन्यजीव कार्यालय व पुणे वन्यजीव विभाग यांच्यातर्फे सादर करण्यात आला आहेत.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेचा गावकर्‍यांची वनावरील निर्भरता कमी करून शेतीला पूरक असे जोडधंदे निर्माण करणे तसेच मानव व वन्य प्राण्यांतील संघर्ष कमी करणे, वन व वन्य जीवांचे संरक्षण करणे हा मूळ उद्देश आहे. ल्यामुळे आता तालुक्यातील वन व्यवस्थापनाचा दर्जा तर उंचावेल शिवाय पर्यायी रोजगार देखील उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.