जामखेड : रक्षाबंधनाच्या पुर्व संधेला महिलेसह तीन मुलींचा मृतदेह विहिरीत आढळला
सार्वमत

जामखेड : रक्षाबंधनाच्या पुर्व संधेला महिलेसह तीन मुलींचा मृतदेह विहिरीत आढळला

ह्रदय हेलावुन टाकणारी दुदैवी घटना

Arvind Arkhade

जामखेड |तालुका प्रतिनिधी |Jamkhed

रक्षाबंधनाच्या पुर्व संधेला ह्रदय हेलावुन टाकणारी दुदैवी घटना जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे एका महिलेसह तीन मुलींचा विहीरीत मृतदेह आढळून आला आहे. अद्याप कारण मात्र समजू शकले नाही. मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील भोगलवाडी शिवारात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका महीलेस तीच्या तीन मुलींचा मृतदेह विहीरीतील पाण्यात अढळुन आला. मात्र घटना नेमकी कशा मुळे घडली हे अद्याप समजु शकले नाही. घटनेची माहिती मिळताच कुसडगाव येथील सरपंच हवा सरनोबत, पोलीस पाटील निलेश वाघ माजी पंचायत समिती सदस्य शरद कार्ले यांनी घटनास्थळी धाव घेतली. व तसेच सदरची घटना यांनी जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे व जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना सांगितली.

या नंतर तात्काळ तहसीलदार व पोलीस निरीक्षक सह पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली . एक तासानंतर चारही मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने विहीरीच्या बाहेर काढण्यात आले चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

आईसह तीन मुलींचे मृतदेह विहिरीत अढळुन आल्याने कुसडगाव परिसरसह जामखेड तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्ये मयताची नावे स्वाती राम कार्ले (वय ३० आई), कोमल राम कार्ले (वय ६ मुलगी), सायली राम कार्ले (वय ९ मुलगी), अंजली राम कार्ले (वय ११ मुलगी) असे आहे. पुढील तपास जामखेड पोलिसांचे वेगाने सुरु जामखेड तालुक्यात हया घटनेने एकच खळबळ उडाली आहे

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com