जामखेड l तालुका प्रतिनिधी l Jamkhed

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील किल्ल्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, हे काम तातडीने चालू करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने दिला आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, "जामखेड तालुक्यातील खर्डा येथील किल्ला या राज्यस्तरीय स्मारकाच्या गड किल्ले संवर्धन जतन व दुरुस्तीसाठी ३,८०,६२,७९९ असा निधी उपल्ब्ध झाला होता व त्या निधीमार्फत तीन वर्षापासून किल्याचे दुरूस्तीचे काम चालु आहे. तरी सदरील काम कधी चालु तर कधी बंद असल्यामुळे तेथे मनमानी कारभार चालु आहे. हे काम मे. कंट्रक्शन टेक्निक ईजिनीअरस अँड कंट्रक्शन ए /२६ राँयल इंडस्ट्रीयल ईस्टेट नायगाव कास रोड नं ७ वडाला मुंबई या कंपनीला मिळाले असुन त्या ठेकेदाराकडे कोणत्याही प्रकारचे कुशल कारागीर नसुन पुरात्व खात्याने या कंपनीला जे अटी शर्त घालुन दिल्या आहेत, त्याचे पालन केले जात नसुन संबधित शासकीय आधिकारी सदरील कामामध्ये जाणीव पुर्वक दुर्लश व हलगर्जीपणा करीत आहेत. आम्हीं शिवप्रेमी धारकरी खर्डा किल्ल्यावरती वेळोवेळी गेलो असता तेथील कामाचा दर्जा वापरले जाणारे साहित्य व काम करण्याची पध्दत अतिशय चुकीची व निकृष्ट पध्दतीने काम चालु आहे. चालु असलेल्या कामा संदर्भात आम्ही शिवप्रेमी किल्ल्यावर गेलो असतासंबधीत शासकीय आधिकारी कामावर अनुउपस्थीत असतात व भेटीसाठी टाळाटळ करतात सन २००८ पासुन आम्ही शिवप्रेमीनीं वेळीवेळी किल्याच्या संवर्धनासाठी अनेक वेळा तक्रारी व आंदोलने केली तरी देखील त्याकडे आज पर्यत दुर्लक्ष केले गेले. कामाचे बजेट वाढावे म्हणुन कामात जाणीवपुर्वक दिरगांई केली जात आहे व ठरलेल्या वेळेमध्ये काम पुर्ण केले जात नाही तरी किल्ल्याचे काम तातडीने चालू करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल."

तसेच "मागणी सदर कामाच्या बांधकाम साहित्ये प्रमाणपत्र योग्य आहे का याची खात्री करुन संबधित आधिकार्यावर कारवाई करण्यात यावी, सदर कामासाठी शासकीय शिबीर प्रमुखांची नेमनुक केलीली असुन सदर शिबीर प्रमुख कामावर येत नाहीत, सदरील काम वर्क आँडर ईस्टेमेट प्रमाणे झाले का, कुशल कारागिरीमार्फत किल्ल्याचे काम उत्कृष्ट करावे, सदरील कामाचा निधीचा व ईस्टेमेट चा फलक लावण्यात यावा", अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका प्रमुख पांडुराजे मधुकर भोसले यांनी केली आहे.