जामखेडकरांकडून 23 लाखांचा दंड वसूल

नियम भंग करणार्‍या वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई
File Photo
File Photo

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड पोलीसांनी शहरातील वाहतूक नियंत्रण करताना नियम भंग करणार्‍या वाहनचालकांवर विविध प्रकारच्या कारवाया करत तब्बल जानेवारी 2022 ते ऑक्टोबर 2022 या सात महिन्यांत 22 लाख 72 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल आजीनाथ जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली. यामध्ये वाहतुकीस अडथळा करणारी वाहने न्यायालय केसेस 28 - दंड 5600, अवैध प्रवाशी वाहतूक 5 केसेस - 13 हजार 300 रुपये दंड, दारू पिऊन वाहन चालवणे 9 केसेस - 16 हजार 900 दंड, ऑनलाईन 3 हजार 923 केसेस 22 लाख 72 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहन धारकांना शिस्त लावण्याबरोबरच दंडाची मोठी रक्कम वसूल करून शासनाला मोठा महसूल मिळवून देण्याचे कामही जामखेड पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेकडून केले आहे. या कामगिरीचे कौतुक होत आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉ. दिनेश गंगे, होमगार्ड रफिक तांबोळी यांनी ही कामगिरी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com