दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, मुद्देमालही जप्त

दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, मुद्देमालही जप्त

जामखेड | तालुका प्रतिनिधी

जामखेड शहरात २७ डिसेंबर रोजी पडलेल्या एका दरोड्याच्या गुन्ह्यातील ६ दरोडेखोरांच्या टोळीला अवघ्या १५ दिवसात दरोड्यातील मुद्देमाल व शस्रांसह जेरबंद करण्यात जामखेड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, २७ डिसेंबर २०२१ रोजी जामखेड शहरातील विजय खुपसे (रा.शिक्षक कॉलनी) यांच्या घरावर दरोडा टाकून घरातील पैसे व सोने आदी मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, जामखेड पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात व टीम, तसेच डॉग स्कॉड, फिंगरप्रिट, स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांनी भेट दिली होती. सदरील घटना घडल्याचे अनुषंगाने वरीष्ठांनी तपासाच्या सुचना देवुन तपास पथके तयार केली होती.

दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, मुद्देमालही जप्त
PHOTO : मुकेश अंबानींकडून अलिशान हॉटेलची खरेदी; तब्बल ७३५ कोटींची गुंतवणूक

सदर गुन्ह्याचा तपास करीत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात व गुन्हे शोध पथकाने नितीन ऊर्फ कव्या धनसिंग पवार (रा.गोरोबा टॉकी, जामखेड हल्ली रा.पोखरी ता.आष्टी जि.बीड), जटा सुखलाल पारधी (रा.जमनीटोला ता.सोहादपुर जि.होशिंगाबाद राज्य मध्यप्रदेश), अक्षय ऊर्फ काळया लाखन पवार (रा.मिलिंदनगर, जामखेड) अनिल ऊर्फ लखन रतन ऊर्फ रवि काळे (रा.लिंपनगाव, ता.श्रीगोंदा) संतोष ऊर्फ बुट्ट्या कंठीलाल पवार (रा.खंडोबावस्ती, जामखेड) सुरज कान्हु पवार (रा.मिलिंदनगर, जामखेड) या ६ दरोडेखोरांना जेरबंद करण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे.

दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, मुद्देमालही जप्त
Irrfan Khan Birth Anniversary : आठवणीतला इरफान खान…

यावेळी मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली हत्यारे हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पो. उप. नि. राजु थोरात, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल संग्राम जाधव, संदिप राऊत, विजय कोळी, आबा आवारे, अरूण पवार, संदिप आजबे, सचिन देवढे यांनी केली आहे.

दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, मुद्देमालही जप्त
Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेच्या मनमोहक सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com