
जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
महाराष्ट्रातील मराठी माणूस देशाचा कणा आहे मराठी माणसाचा अपमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला असल्याचे सांगत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला.
जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले. राज्यपालांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. देशाला वेगळे करण्याचे काम कोणी करू नये, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी केले. तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे म्हणाले, राज्यपाल कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य मराठी माणसासह राज्याचा अपमान करणारे असून ज्यांच्याकडे घटनेचा सांभाळ करण्याची जबाबदारी सोपावलेली आहे. ती व्यक्ती घटनाविरोधीचे कृत्य करते आणि त्यावर केंद्रातील भाजपचे सरकार मूग गिळून गप्प बसले आहे.
यावेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, राजेंद्र पवार, अमित जाधव, शहर उपाध्यक्ष प्रा. राहुल आहेर, युवक शहराध्यक्ष अमोल गिरमे, प्रकाश काळे, अवधूत पवार, प्रा.विकी घायतडक, प्रा. प्रदीप राळेभात, इस्माईल सय्यद, मोहन पवार, समीर चंदन, फिरोज बागवान, सुरेश भोसले, नरेंद्र जाधव, संतोष निगुडे, वैजीनाथ पोले, प्रकाश सदाफुलेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.