जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

तालुक्यातील नान्नज येथे जामखेड करमाळा रस्त्यावर नान्नजच्या पोलीस दूरक्षेत्र शेजारीच राहणारे शंकर कल्याण गाडेकर यांच्या राहत्या घराचे दिवसा

अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील 6 तोळ्याचे दागिने व रोख रक्कम 10 हजार रुपये असा एकूण 1 लाख 24 हजारांचा ऐवज लंपास केला. नान्नजमध्ये भरदिवसा पोलीस दूरक्षेत्र शेजारीच घरफोडीमुळे गावात व परिसरात नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हनुमंत गाडेकर यांनी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

शुक्रवारी गाडेकर यांचे कुटुंब ज्वारी काढण्यासाठी शेतात गेले होते. सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान शेतातून परत घरी आले असताना हा प्रकार उघडकीस आला. घडलेल्या घटनेबाबत कल्याण गाडेकर यांचा मुलगा हनुमंत गाडेकर याने जामखेड पोलिसांत फिर्याद दाखल केली.

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलीस नाईक संजय लोंखडे, पोलीस हवालदार शिवाजी भोस, पोलीस कॉ. बाबासाहेब तागड, पो. कॉ. विजय सुपेकर पुढील तपास करीत आहेत.

दिवसा घरफोडी झाल्याने गावात उलटसुलट चर्चा सुरू झाली असून नान्नज पोलीस दूरक्षेत्रच्या पोलीस कर्मचार्यांनी गस्त करून नान्नज पोलीस दूरक्षेत्र येथेच कायमस्वरूपी थांबावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.