जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड नगरपरिषदेतील कर्मचार्यांचे 2 महिन्यांचे पगार थकविले आहेत. थकीत पगार 25 डिसेंबर 2020 पर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील,

असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी दिले. यावेळी मधुकर राळेभात, नगराध्यक्ष निखिल घायतडक, माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, नगरसेवक अमित जाधव व नगरसेवक गुलशन अंधारे यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दंडवट व भीक मांगो आंदोलन करून तहसीलसमोर प्राणांतिक उपोषण मागे घेण्यात आले.

लोकाधिकार आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारलेल्या आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी भटके-विमुक्त आघाडीचे राज्य सहसमन्वयक अॅड. अरुण जाधव यांनी केले. लोकाधिकार आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब ओहोळ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष द्वारका पवार ,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाअध्यक्ष अतिष पारवे, भीमराव चव्हाण ,अरुण डोळस आदी आंदोलनात सहभागी झाले.

आंदोलनात ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते सचिन भिंगारदिवे, सागर भांगरे, संतोष चव्हाण, वैजीनाथ केसकर, राकेश साळवे, विशाल जाधव, अंकुश पावार, मच्छिंद्र जाधव ,सोनू जाधव, योगेश सदाफुले, बाळू भालेराव, पप्पू सदाफुले, मुकुंद घायतडक, गणेश घायतडक, रवी सदाफुले, किशोर कांबळे, हरी जाधव, बबलू जाधव, राकेश जाधव, केशव जाधव,गणेश जाधव, आकाश जाधव आदी सहभागी झाले होते.