नगरपरिषद मुख्याधिकार्‍यांची तडकाफडकी बदली

दोन आमदारांच्या वादात अधिकार्‍यांचा बळी
जामखेड नगरपरिषद
जामखेड नगरपरिषद

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची तडकाफडकी बदली करण्सयात आली आहे. त्यांच्या कारभाराबाबत आमदार राम शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दंडवते यांची बदली करण्याची मागणी केली होती. यातूनच ही बदली झाली. दोन आमदारांच्या वादात अधिकार्‍यांचा मात्र बळी जात असल्याची शहरात चर्चा आहे.

जामखेड मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या बदलीचा आदेश शुक्रवारी (दि.23) नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे अवर सचिव अ. का.लक्कस यांनी जारी केला. शुक्रवारी त्यांना पदमुक्त होण्यास सांगण्यात आले आहे. अहेरी (गडचिरोली) नगरपंचायत येथील अजय साळवे हे जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची येथील कारकिर्द काहीशी वादग्रस्त ठरली असली तरी मिनीनाथ दंडवते यांनी घरकुल योजना, दिव्यांग घटकांसाठीच्या योजना यासह विविध विषयांबाबत चांगले काम केले. पंधरा दिवसांपूर्वीच आ. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे शहराध्यक्ष बिभीषण धनवटे अमित चिंतामणी यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे नगरपरिषद मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांची खातेनिहाय चौकशी करून बदली करण्याची मागणी केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com