जामखेड दूध आंदोलन
जामखेड दूध आंदोलन
सार्वमत

जामखेड येथे रस्त्यावर दूध ओतून आंदोलन

Arvind Arkhade

जामखेड|तालुका प्रतिनिधी|Jamkhed

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुधाला 10 रुपये दरवाढ करावी व पाच रुपये अनुदान दूध उत्पादक शेतकर्‍यांना द्यावे तसेच दूध भुकटीला 30 रुपये प्रति किलो अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी तालुक्यातील दूध बंद आंदोलन करून दूध रस्त्यावर ओतून निषेध केला.

यावेळी जामखेड शहर व तालुक्यातील, खर्डा, घोडेगाव, पाडळी, खुरदैठण, पाटोदा, पिंपखेड, डोणगाव, बांधखडक, राजेवाडी, लोणी, दौंडाचीवाडी, कवडगाव, माळेवाडी यासह सर्व गावांतील दूध संकलन 100 टक्के बंद होते.

यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, तालुकाध्यक्ष मंगेश दादा आजबे, संघटनाप्रमुख हनुमान उगले, युवक तालुकाध्यक्ष अ‍ॅड. ऋषिकेश डुचे, शहरध्यक्ष भाऊसाहेब डोके, उपसरपंच बाळासाहेब ठाकरे, जनार्दन भोंडवे, नितीन जगताप, अशोक आजबे, प्रदीप वाळुंजकर, अप्पासाहेब डोके, बंडू मुळे, महादेव डोके, बाबू साळुंखे, आबासाहेब जाधव, अशोक जगदाळे, ईश्वर खैरे, अमोल खैरे, अशोक खैरे, तात्या भिसे, सागर लोंढे, विठ्ठल पोटे, आविराज मोरे, अश्विन खैरे आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com