जामखेडमध्ये अवैध सावकारी करणार्‍यांच्या घरावर छापा

सहकार विभाग झाले आक्रमक : घराच्या झडतीमध्ये संशयास्पद कागदपत्र हाती
जामखेडमध्ये अवैध सावकारी करणार्‍यांच्या घरावर छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जामखेड (Jamkhed) येथील अन्सार युसूफ पठाण, रा.सदाफुलेवस्ती यांच्या विरोधात अवैध सावकारी (Illegal lending) करत असल्याची असलेची तक्रार जिल्हा उपनिबंधक (Complaint District Deputy Registrar), सहकारी संस्थाच्याकडे (Co-operative Society) दाखल झाली होती. त्यानूसार बुधवारी सहकार खात्याने पठाण यांच्या घरावर छापा टाकला.

जिल्हा उपनिबंधक दिग्बिजय आहेर (District Deputy Registrar Digbijay Aher) यांनी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चेकलम 16 अन्वये कार्यवाही करण्यासाठी सहायक निबंधक, सहकारी संस्था, जामखेड (Jamkhed) यांना आदेश दिले होते. त्यानुसार सहायक निबंधक देविदास घोडेचोर यांन कलम 16 अन्वये अवैध सावकार पठाण याच्या घराची झडती (Home Raid) घेण्यासाठी पथक नेमले. या पथकात सहकार अधिकारी प्रथम श्रेणी साहेबराव पाटील हे पथक प्रमुख, तर सहकार अधिकारी द्वितीय श्रेणी अल्ताफ शेख, कनिष्ट लिपीक संतोष वासकर, कनिष्ट लिपीक निलेश मुंढे यांचा समावेश होता.

या पथकासोबत पोलीस बंदोबस्त (Police Protestion) ठेवण्यात आला होता. या घोडेचोर यांनी पंचासह धाड टाकुन झडती (Raid) घेतली. या झडतीमध्ये कोरे चेक, कोरे बाँड, विसार पावती असे अनेक संशयास्पद कागदपत्रे आढळुन आली आहेत. ही कागदपत्रे पुढील कार्यवाहीसाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, जामखेड यांच्या कार्यालयात सादर करण्यात आली आहेत. सापडलेल्या कागदपत्रांची (Document) पडताळणी करुन अवैध सावकारा विरुध्द महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड (PI Sambhaji Gaikwad) यांचे मार्गदर्शन लाभले.

जिल्हयातील अवैध सावकारांच्या जाचास त्रस्त व पिडीत नागरीकांनी स्व:हन पुढे येवुन सहकार विभागाकडे पुराव्यासह तक्रार नोंदवावी. या तक्रार बाबत अर्जदार यांनी गोपनियता बाळगण्यात येवून अवैध सावकार कायद्यानूसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com