जामखेडच्या चार ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांची निवडणूक

30 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरूवात
जामखेडच्या चार ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांची निवडणूक

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींच्या रिक्त पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार 30 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे.

तालुक्यातील जवळा, सावरगाव, नायगाव व आघी येथील ग्रामपंचायत सदस्यांचे निधन झाल्याने व यापुर्वी रिक्त राहिलेल्या पदासाठी निवडणूक होणार आहे. अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.

30 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. अर्ज भरण्याचा अंतिम दिवस 6 डिसेंबर आहे.7 डिसेंबर रोजी छाननी, तर 9 डिसेंबर अर्ज माघारीचा दिवस व चिन्ह वाटप होणार आहे. या जागांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान तर 22 रोजी मतमोजणी होणार आहे, यामध्ये मौजे जवळा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्वसाधारण जागा, तसेच सावरगाव प्रभाग 1 मध्ये अनुसूचित जाती, नायगाव प्रभाग 1 मधील सर्वसाधारण जागा, आघी येथील प्रभाग 3 मधील अनुसूचित जाती स्त्री प्रभागातील रिक्त सदस्यांची पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी निवडणुकीचे नियोजन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे. संबंधित गावापुरती आचारसंहिताही निकाल लागेपर्यंत लागू राहणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com