जामखेड तालुक्यात बिबट्यानंतर आता कोल्ह्याची दहशत

रत्नापुर परिसरातील चार व्यक्ति हल्ल्यात जखमी
जामखेड तालुक्यात बिबट्यानंतर आता कोल्ह्याची दहशत

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील (Jamkhed) परिसरात बिबट्याची (leopard) दहशत कमी होते ना होते तोच आता कोल्ह्याची (Fox) दहशत निर्माण झाली आहे. जामखेड तालुक्यातील रत्नापूर (Ratnapur) परिसरातील चार व्यक्ती कोल्हाच्या हल्ल्यात जखमी (Fox Attack Injured) झाल्याने आता कोल्हाच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रत्नापुर येथील बाळासाहेब वारे, विमल वारे, भाऊसाहेब वारे, लक्ष्मण वारे यांना कोल्हा चावला (fox bit) असून जबर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ताने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिली. आणि या जखमींना प्रशासनामार्फत काही मदत करता आल्यास करावी अशी विनंती केली. यावेळी ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital) येथील डॉक्टर वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नगरला पाठवण्यात आले आहे. यावेळी रत्नापुर येथील ग्रामस्थांनी मदत केली.

रत्नापूर परिसरातील चार व्यक्तींवर लांडग्याने हल्ला केला आहे. एक तर तो कोल्हा पिसाळलेला असावा किंवा त्याचे पिल्ले जवळ असावेत किंवा त्यांच्यावर कोणीतरी हल्ला केलेला असावा त्यामुळे त्याने लोकांवर हल्ला केला असावा असे आम्ही सांगितले होते. जखमींना नगरला पाठवल्यानंतर दुपारी मृतावस्थेत कोल्हा परिसरात सापडला आहे. त्यामुळे कोल्ह्याने हल्ला केला हे सिद्ध झाले आहे. घटना समजताच वनरक्षक प्रवीण उबाळे, किसन पवार हे ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात येऊन जखमींना मदत केली जामखेडला इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नगरला हलविण्यात आले आहे. नागरिकांनी ग्रामीण भागात सावधानता बाळगावी कोल्हा, लांडगा आणि तरस दिसल्यावर त्याच्यावर हल्ला करू नये असे आवाहन वनपरिमंडळ अधिकारी अनिल खराडे यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com