...तर मी स्वतःहुन जेलमध्ये बसण्यास तयार : माजी सभापती डॉ. भगवानराव मुरुमकर

...तर मी स्वतःहुन जेलमध्ये बसण्यास तयार : माजी सभापती डॉ. भगवानराव मुरुमकर

जामखेड | तालुका प्रतिनिधी

जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर यांच्यावर जामखेडचे व्यापारी अंदुरे कुटूंबाने खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या बाबत सदर खंडणीच्या गुन्ह्यात माझा कसलाही संबंध नसुन माझ्या उभ्या राजकारण करत असताना कोणत्याही व्यापाऱ्यास खांडणी मागीतली असेल तर राजकीय संन्यास घेईल असे मत पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

जामखेड पोलिस स्टेशनला व्यापारी अंदुरे कुटूंबाने जामखेडचे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर यांच्यासह एकुण आठ जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सदरचे आरोप खोटे असुन या प्रकरणी नुकतीच जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर यांनी बुधवार दि २६ रोजी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर असलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

पुढे बोलताना मुरूमकर म्हणाले, व्यापारी अंदुरे कुटूंबाने माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे मात्र त्यांच्या बाबतच माझ्याकडे अनेक तक्रारी आहेत. अंदुरे बंधु हे रात्री अपरात्री दारु पिऊन लोकांच्या घरांच्या कड्या वाजवतात असे प्रकार पैशाच्या जोरावर घडत आहेत. व्यापारी शशिकांत अंदुरे यांना चिंचपूर जवळील प्लॉटींगमध्ये अश्लील चाळे करताना पकडल्या मुळे लोकानी त्यांना मारहाण केली आहे. आतापर्यंत मी कुठल्याही व्यापाऱ्यास त्रास किंवा अन्याय केलेला नाही. जामखेडच्या अतिक्रमण वेळी मी स्वतः व्यापाऱ्यांच्या मागे उभा होतो. विरोधक माझे राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचा डाव सफल होणार नाही. त्यांना खुले आवाहन करतो की, त्यांनी निवडणूकीत समोरासमोर येऊन लढावे मागुन वार करू नयेत.

पोलिसांना माझे सहकार्य असुन अद्याप माझ्यावर आरोप सिद्ध झाले नाहीत. तसेच जर मी कुठे खंडणी मागितली असेल तर मी स्वतः जेल मध्ये बसण्यास तयार आहे.मात्र माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी कुठे खंडणी मागितली असेल आणि ते सिद्ध झाले तर मी राजकीय संन्यास तयार आहे असे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर पत्रकार परिषदेत म्हणले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com